प्रकाश आंबेडकर नगर येथे एचआयव्ही तपासणी व जनजागृती शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड।एस.एम.न्युज़ - जिल्हा रुग्णालय, बीड आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड, बीड येथे आयोजित करण्यात आलेले एचआयव्ही तपासणी व जनजागृती शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरादरम्यान नागरिकांना एचआयव्ही संसर्गाविषयी योग्य व शास्त्रीय माहिती देण्यात आली. तसेच संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर एचआयव्ही तपासणीचे महत्त्व आणि आरोग्यविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांच्या शंकांचे समुपदेशनाद्वारे निरसन करून आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात २५ एचआयव्ही (HIV) आणि २५ सिफिलिस (Syphilis) तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घेत आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी PHC मेडिकल ऑफिसर डॉ. हाश्मी सर, प्रभागाचे नगरसेवक चक्रे सर, ICTC समुपदेशक हिवरेकर मॅडम, DSRC समुपदेशक घनगाव सर, एएनएम काचगुंडे मॅडम, संपूर्ण सुरक्षा केंद्राचे व्यवस्थापक शोएब शेख, ORW मनिषा स्वामी, ORW दीपक लोंढे तसेच आशा सेविका गायकवाड मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्कृष्ट टीमवर्क, प्रभावी समन्वय व सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. समाजात एचआयव्ही व इतर लैंगिक संसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती वाढविणे, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना वेळेवर तपासणीसाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यातही अशा आरोग्य जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
👇👇👇👇👇
Nursery road, Beed.
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा