Breaking News

गौतम खंडागळे अष्टपैलू समाजभूषण तर एम.एम.शेख कला-साहित्य व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

गौतम खंडागळे अष्टपैलू समाजभूषण तर एम.एम.शेख कला-साहित्य व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

सा. युवा लोकमित्र च्या दिमाखदार सोहळ्यात दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव

बीड।एस.एम.न्युज़

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि गेल्या काही वर्षांपासून एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तम नावलौकिक मिळविलेले आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील मूळ रहिवाशी असलेले गौतम खंडागळे यांना सा. युवा लोकमित्र च्या दिमाखदार सोहळ्यात अष्टपैलू समाजभूषण तर बीड शहरातील प्रसिद्ध गायक एम.एम.शेख यांना कला-साहित्य व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रित्यर्थ समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.
                एकीकडे गौतम खंडागळे हे मुंबईत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रशासनिक स्तरावर आपले कर्तव्य चोख बजावत असताना दुसरीकडे त्यांनी आपल्यातील कलावंतही सदैव जागृत ठेवला आहे. गेल्या २० वर्षांपासून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी 'स्वर साधना आर्केस्ट्रा' च्या माध्यमातून महाराष्ट्रभर संगीताचे आणि समाजप्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत.
               गायक एम. एम. शेख हेही अनेक थोर महापुरुषांच्या साहित्याची पुस्तके विक्री करतानाच आपल्या गायनकलेचे छंद जोपासत अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एक चांगल्या गोड गळ्याचा व उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपास आले आहेत. आता ते फक्त बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर दर दिवशी कुठे ना कुठे गीत-संगीताचे कार्यक्रम घेत असतात. असे कार्यक्रम घेण्याकरिता त्यांनी स्वतः सह अनेक गायक व गायिकांना एकत्रित करून चांगला मोठा संच तयार केला आहे. त्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना सा. युवा लोकमित्र कडून कला साहित्यातील समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
                 सा. युवा लोकमित्र चे संपादक तथा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजक ताहेर शेख यांनी आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात गौतम खंडागळे आणि एम.एम.शेख यांना राज्यमंत्री दर्जा असलेले वक्फ महामंडळाचे चेअरमन समीर काझी, बीड नगरपरिषद च्या नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, ज्येष्ठ नेत्या सुशीला ताई मोराळे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख, भागवत तावरे, गणेश सावंत, वैभव स्वामी यांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित केले.
            या प्रित्यर्थ अस्मिता अहिरे, संध्या-आकाश जाधव, कृष्णा पांगरे या गायक-गायिकांसह बीड जिल्हा परिषदेतील अधिकारी पठाण युसूफ़ खान यांनी भरभरून शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
                   हा दिमाखदार गौरव सोहळा शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता बार्शी नाका चौक बार्शी रोड बीड येथील ताज पॅलेस कादरपुरा येथे पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

👇👇👇👇

*गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच* 

*पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या.

___________________________________________


*S.K.P. Motor Driving School*

Nursery road, Beed.

___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - एस.एम.युसूफ़

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत