एस.एम.युसूफ़ यांच्या पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा सा. युवा लोकमित्र कडून ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्काराने गौरव
एस.एम.युसूफ़ यांच्या पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
सा. युवा लोकमित्र कडून ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्काराने गौरव
बीड।एस.एम.न्युज़
एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांना नुकतेच सा. युवा लोकमित्र परिवाराकडून संपादक ताहेर शेख यांनी ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्कार देऊन गौरविले. गेल्या १३ वर्षात पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता करत असताना त्यांना आतापर्यंत ७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात मानाचा हा सातवा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापुढेही त्यांच्याकडून निष्पक्ष, निर्भीड आणि समाजोपयोगी पत्रकारिता सदैव सुरू राहावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
यावेळी बार्शी रोड वरील ताज पॅलेस येथे रंगलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना राज्यमंत्री दर्जा असलेले वक्फ़ महामंडळाचे चेअरमन समीर काज़ी, बीड शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला ताई मोराळे, खास पुरस्कार वितरण समारंभासाठी आलेले चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक अल्ताफ दादासाहेब शेख धडाडीचे नेते भागवतराव तावरे, दैनिक रिपोर्टर चे कार्यकारी संपादक गणेशराव सावंत, दैनिक समर्थ राजयोग चे संपादक वैभवराव स्वामी यांच्या हस्ते ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांचे शुभचिंतक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे ही उपस्थित होते.
मान्यवरांची मते अन् वडिलांचे आनंदाश्रू
गेल्या काही वर्षांपासून वाकर शिवाय चालू शकत नसलेले एस.एम.युसूफ़ यांचे वडील मुहम्मद अब्दुल रऊफ हे आपल्या मुलाला पुरस्कार घेताना पाहण्यासाठी वाकर सहित कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिले. मंचावरून सूत्रसंचालन करणारे मुहम्मद अब्दुल रहीम उर्फ गुलाम साकिब यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नजमा सुलताना उस्मानी आणि चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांनी युसूफ़ यांच्या विषयी व्यक्त केलेल्या मनोगतांनी त्यांचे वडील मुहम्मद अब्दुल रऊफ भारावून गेले. त्यांना गहिवरून आले व त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. हा भावनिक क्षण अनेकांनी पाहिला. यावेळी सूत्रसंचालक गुलाम साकिब व्यासपीठावरून खाली आले आणि त्यांना म्हणाले, काका धन्य आहात तुम्ही. तुमच्या पोटी परखड लेखणीच्या माध्यमातून उत्कृष्ट समाज कार्य करणारा युसूफ़ भाई सारखा हिरा जन्मला.
*एस.एम.युसूफ़ यांना आतापर्यंत उत्कृष्ट पत्रकारितेकरिता मिळालेले पुरस्कार
(पोस्टर डिझाइन बाय - फ़ारूख़ शेख)२) जीवन स्फूर्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रुद्रापूर व जिज्ञासा गुरुकुल यांचा संयुक्त पुरस्कार
३) मातृभूमी प्रतिष्ठानचा पुरस्कार
४) पद्मपाणी प्रतिष्ठान चा पुरस्कार
५) निर्भिड पत्रकार संघाचा पुरस्कार
६) दैनिक प्रभास केसरी चा पुरस्कार
७) सा. युवा लोकमित्र चा ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर चा पुरस्कार
आतापर्यंत अशा सात पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
👇जा👇हि👇रा👇ती👇
गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच
पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!
___________________________________________
Nursery road, Beed.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा