सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांची बीड शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट! कारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली, मन्सूरशहा दरगाह रुपेरी पडद्यावर दाखविण्याची इच्छा
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांची बीड शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट
कारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली, मन्सूरशहा दरगाह रुपेरी पडद्यावर दाखविण्याची इच्छा
बीड।एस.एम.न्युज़
मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांनी बीड शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन पाहणी केली असता ते कारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली दरगाह आणि मन्सूरशहा दरगाह पाहून भारावले आणि त्यांनी कथानकानुसार संधी मिळाल्यास या ऐतिहासिक वास्तूंना रुपेरी पडद्यावर दाखविण्याची इच्छा व्यक्त केली.
एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या विनंतीवरून ते सा. युवा लोकमित्र वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार वितरण समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून बीड शहरात आले होते. येथे आल्यानंतर एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी त्यांना शहरातील ऐतिहासिक स्थळे दाखवून या स्थळांबद्दलची माहिती दिली. ही ऐतिहासिक स्थळे पाहून त्यांच्यातील दिग्दर्शकाच्या दृष्टीने त्यांना ही ऐतिहासिक स्थळे रुपेरी पडद्यावर यावीत म्हणून कथानकानुसार जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आपण बीडला येऊन या स्थळांना रुपेरी पडद्यावर अवश्य दाखवू असे म्हटले. यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक इमरान कादरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा