संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, गायक एम.एम.शेख यांचा सत्कार
संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, गायक एम.एम.शेख यांचा सत्कार
बीड।एस.एम.न्युज़
एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांना ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर आणि प्रसिद्ध गायक एम.एम.शेख यांना कलाभूषण व समाजभूषण या पुरस्कारांनी दिनांक २० जून रोजी सा. युवा लोकमित्र वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या समारंभामध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला दर्दी व्यक्तिमत्व असलेले युसूफ़ पठान, मज़हरूद्दीन शेख, मुजीब सय्यद, सैलानी शेख यांनी दोघांचा कपडे, पुष्पहार आणि मिठाई देऊन हृदयी सत्कार करत दोन्ही कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कारांनी होणारा सन्मान अभिमानास्पद असल्याचे उद्गार काढले.
हा छोटेखानी सत्कार समारंभ स्वरांजली संगीत अकॅडमी मध्ये पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीत विशारद गायक मज़हरुद्दीन शेख, युसूफ़ पठान, मुजीब सय्यद, हर्ष साळवे, समीर शेख, मनीषा दळवी, राहुल गवळी, सैलानी शेख, दानिश शेख, लईख़ शेख, मुबारक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी एस.एम.युसूफ़ आणि एम.एम.शेख यांना हृदयी शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा