‘युवा लोकमित्र’चा ५ वा वर्धापन दिन सोहळा ठरणार ऐतिहासिक; विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या २८ रणयोद्ध्यांचा रंगणार भव्य गौरव! "लेखणीचा स्वाभिमान आणि कर्तृत्वाचा सन्मान! समाजाच्या अंधाराशी लढणाऱ्या २८ अष्टपैलू योद्ध्यांची ‘युवा लोकमित्र’कडून पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा!"
‘युवा लोकमित्र’चा ५ वा वर्धापन दिन सोहळा ठरणार ऐतिहासिक; विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या २८ रणयोद्ध्यांचा रंगणार भव्य गौरव!
"लेखणीचा स्वाभिमान आणि कर्तृत्वाचा सन्मान! समाजाच्या अंधाराशी लढणाऱ्या २८ अष्टपैलू योद्ध्यांची ‘युवा लोकमित्र’कडून पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा!"बीड।एस.एम.न्युज़ - आपल्या निर्भीड लेखणीच्या जोरावर आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत अवघ्या पाच वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले बीडचे अग्रगण्य वृत्तपत्र 'साप्ताहिक युवा लोकमित्र' आपल्या यशस्वी घोडदौडीची ५ वर्षे पूर्ण करून ६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला-साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या अथांग कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या राज्यातील २८ अद्वितीय रणयोद्ध्यांचा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी अधिकृत घोषणा 'युवा लोकमित्र' पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
हा अभूतपूर्व आणि दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ०६:०० वाजता, 'ताज पॅलेस', कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता, साहित्य, राष्ट्रसेवा, सामाजिक एकता आणि जनकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये शेख शाहिदा बेगम अब्दुल रहीम यांना राजमाता जिजाऊ स्मृती शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार, सीमाताई ओस्तवाल यांना त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती आदर्श समाजस्वामिनी पुरस्कार, रूपाली जयंतराव देशपांडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती राज्यस्तरीय 'साहित्यरत्न व समाजभूषण' पुरस्कार, मसरत सुलताना अन्सारी यांना क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार, डॉ. फहमीदा अनीसुद्दीन यांना युवा लोकमित्र उत्कृष्ट आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार, आम्रपाली साबळे यांना युवा लोकमित्र रणरागिणी सामाजिक गौरव पुरस्कार, छाया सरोदे यांना युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान पुरस्कार,जावेद भैय्या कुरेशी यांना शेर-ए-हिंद मौलाना बरकतुल्लाह स्मृती राष्ट्रसेवा व समाजभूषण पुरस्कार, मिर्झा नियामत बेग यांना शिक्षण महर्षी, शिक्षण भूषण जीवन गौरव पुरस्कार, हरीभाऊ भगवानराव सोळंखे यांना मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती राष्ट्रनिष्ठा व सामाजिक एकता जीवन गौरव पुरस्कार, चंदन उस्मान पठाण यांना यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, अमजद अहेमद खान क्रांतिवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार, गणेश ढवळे लिंबागणेश क्रांतिवीर अशफाक उल्ला खान स्मृती निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार, डॉ. सय्यद अब्दुल हसीब युवा लोकमित्र आदर्श वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार, सुनील कुर्लेकर युवा लोकमित्र आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार, आश्रुबा (बबनराव) दगडू आंधळे युवा लोकमित्र समाजरत्न गौरव पुरस्कार, प्रकाश अभाराव वाघमारे मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान राज्यस्तरीय सामाजिक क्रांती व देशसेवा गौरव पुरस्कार, गौतम कान्हू खंडागळे मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान समाजरत्न पुरस्कार, प्रा.डॉ. शेख अतिक लतीफ मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान आदर्श आरोग्यदूत जीवनगौरव पुरस्कार, प्रा. डॉ. शेख नासेर अब्दुल खालेख युवा लोकमित्र आदर्श वैद्यकीय प्राध्यापक गौरव पुरस्कार, प्रा. आमेर फराज खतीब भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृती 'मेडिकल मेंटॉर' जीवनगौरव पुरस्कार, शेख जाकेर महेबुब मुस्लिम ओबीसी समाजभूषण नेतृत्व पुरस्कार, एस.एम.युसूफ ऑल टाईम बेस्ट रिपोर्टर गौरव पुरस्कार, परवेज अहमद कुरेशी युवा लोकमित्र आदर्श जनसेवक गौरव पुरस्कार, सलीम अध्यक्ष युवा लोकमित्र कर्तव्यदक्ष सामाजिक योद्धा गौरव पुरस्कार, सय्यद अरफात सय्यद शाहेद शिक्षणमित्र आदर्श शिक्षक पुरस्कार,सलीम पाशामियाँ शेख राज्यस्तरीय युवा लोकमित्र उत्कृष्ट समाजसेवक जीवनगौरव पुरस्कार,एम. एम.शेख युवा लोकमित्र कला-साहित्य व समाजभूषण पुरस्कार,
युवा लोकमित्रच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे हे पर्व केवळ वर्धापन दिन नसून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सलाम करणारा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.आपल्या अथांग कार्याने आणि त्यागाने समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या सर्व रणयोद्ध्यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे वृत्त समजताच, संपूर्ण बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील पुरोगामी चळवळी, शैक्षणिक वर्तुळ, कला-साहित्य क्षेत्र, विविध सामाजिक संघटना, राजकीय गट आणि सर्वधर्मीय समाज बांधवांकडून सर्व सन्मानमूर्तींवर अभिनंदनाचा आणि सदिच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.
"शब्दांच्या आणि संघर्षाच्या या महासोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व जागरूक नागरिकांनी, वाचकांनी, स्नेहीजनांनी आणि कार्यकर्त्यांनी २० जून रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता 'ताज पॅलेस' येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आग्रही आवाहन 'साप्ताहिक युवा लोकमित्र'चे संपादक शेख ताहेर जाफर व युवा लोकमित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा