Breaking News

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख बीडला येणार सा. युवा लोकमित्र च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण समारंभात विशेष उपस्थिती राहणार

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख बीडला येणार

सा. युवा लोकमित्र च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण समारंभात विशेष उपस्थिती राहणार


बीड।एस.एम.न्युज़

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेले मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक, गीतकार अल्ताफ दादासाहेब शेख बीडला येणार असून सा. युवा लोकमित्र च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक, संपादक ताहेर शेख आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिली आहे.
                 महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा बीड जिल्ह्याचे जावई असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी कठोर मेहनत घेऊन आतापर्यंत वेडा बी.एफ. (मराठी), कमॉन विष्णू (कन्नड), धारावी कट्टा (हिंदी, कन्नड, तेलगू), कर्मयोगी आबासाहेब (मराठी, हिंदी) या चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले असून  त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्यांच्या कामाची नोंद घेतली गेली आहे. त्यांनी लोरी (हिंदी) या चित्रपटाची गीते आणि संगीत ही तयार केले आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत स्पॉट बॉय पासून प्रोडक्शन कॉस्ट्यूम डिझायनर, आर्ट डायरेक्टर, अभिनेता अशा विविध स्तरावर काम करून चित्रपटसृष्टीत नाव मिळविले आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करत स्थापित केले आहे. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीसह इतर भाषेतील चित्रपट सृष्टीत सुद्धा त्यांना समाजाला नवी दिशा देणारे, संदेश देणारे चित्रपट लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले अल्ताफ दादासाहेब शेख सा. युवा लोकमित्र च्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक संपादक ताहेर शेख आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिली आहे. अल्ताफ शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या कर्मयोगी आबासाहेब या मराठी-हिंदी चित्रपटात एस.एम.युसूफ़ यांना पत्रकाराचीच भूमिका साकारण्याची संधी दिली होती.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत