Breaking News

विदेशात निर्यात होणाऱ्या मांसावर पूर्णतः बंदी घाला गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा; आठ जून रोजी भव्य निदर्शने आंदोलन

विदेशात निर्यात होणाऱ्या मांसावर पूर्णतः बंदी घाला

गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा; आठ जून रोजी भव्य निदर्शने आंदोलन


देशहितासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आक्रमक

बीड।एस.एम.न्युज़

देशहिताला सर्व परि प्राधान्य देऊन धार्मिक सलोखा राखण्यासाठी गायीला "राष्ट्रीय पशु" घोषित करून देशातील कत्तलखाने सरसकट बंद करुन विदेशात निर्यात होणाऱ्या मांसावर पुर्णतः बंदी घालावी आणि गोवंश हत्याबंदीच्या नावावर निर्माण होणारी सामाजिक तेढ प्रकरणी संविधान आणि कायद्याच्या मार्गाने बंदोबस्त करण्यात यावा. शेतकऱ्यांचे अर्थकारण जपण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे हे आता आक्रमक झाले असून येत्या सोमवारी दिनांक ०८जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन पुकारले असून गायीला राष्ट्रीय पशु घोषित करून धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहनही केले आहे.
                  जेव्हापासून देशात प्रथम गोहत्या व त्यानंतर गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला तेव्हापासून काही ठराविक संघटना आणि काही राजकीय पक्ष या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी फक्त मुस्लिम समाजालाच लक्ष्य करून त्यांच्यावर देशभरात कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाणात दररोज हल्ले करीत आहेत. एवढेच काय मुस्लिम शेतकरी असला आणि त्याने शेतीसाठी गाय किंवा बैल आणले तर त्यालाही बदडून काढले जाते. एखाद्या मुस्लिमाच्या घरी बोकड किंवा बकरीचे मटण असले आणि तो शिजविताना वास आला तर संबंधित मुस्लिमाला जनावरांसारखी मारहाण केली जाते. हे पाहता गोवंश हत्या बंदी कायदा फक्त मुस्लिमांना छळण्यासाठीच निर्माण करण्यात आला का? असा प्रश्न आता मुस्लिमांव्यतिरिक्त इतर धर्मीय भारतीय बांधवांच्या मनात सुद्धा उत्पन्न होऊ लागला आहे. कारण मांस फक्त मुस्लिमच खातात असे नाही तर आपल्या भारत देशात राहणारे अनेक धर्मीय नागरिक सुद्धा खातात, पण डूख धरले जाते ते फक्त मुस्लिमांवर. हे तर झाले फक्त खाण्याविषयी.
                   आता जरा मांसाच्या व्यवसायाकडेही नजर वळवू या. भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये मांस अर्थातच मीट निर्यात करणारे जे काही मोठमोठे कारखाने संपूर्ण भारत देशात सुरू आहेत त्यापैकी दोन-तीन वगळता मांस निर्यात करणारे इतर सर्व कारखाने हे मुस्लिमेत्तरांचे आहेत. त्याकडे मात्र ना गोरक्षक लक्ष देतात, ना शासन-प्रशासन. मुस्लिमेत्तर असलेल्या लोकांच्या मोठमोठ्या कारखान्यांमधून भारताबाहेर दररोज अनेक टन मीट निर्यात केले जाते मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही परंतु मांस विक्रीचा लहान-सहान सटरफटर व्यवसाय करणाऱ्या कुरेशी बांधवांना लक्ष्य करून त्यांचा व्यवसाय वेळोवेळी काहीही कारणे काढून बंद केला जातो. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले जातात. या सर्व बाबी पाहून आता मुस्लिमेत्तर समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता आली असून याविषयी आता ते सुद्धा आवाज उठवू लागले आहेत. मग ते मुस्लिमेत्तर शेतकरी असो की सामाजिक कार्यकर्ते.
                     बीड जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या निदर्शनास या सर्व बाबी आल्यानंतर ते आक्रमक झाले असून याविरोधात आता त्यांनी विदेशात निर्यात होणाऱ्या मांसावर पूर्णतः बंदी घालावी, गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावे या मागण्यांसाठी येत्या ०८ जून २०२६ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत