Breaking News

एक शाम मुहम्मद रफी साहब के नाम कार्यक्रमासाठी शाहिद रफी यांची भेट बीडच्या गायक कलाकारांच्या शिष्टमंडळाने कार्यक्रमात येण्याचे दिले निमंत्रण

एक शाम मुहम्मद रफी साहब के नाम कार्यक्रमासाठी शाहिद रफी यांची भेट

बीडच्या गायक कलाकारांच्या शिष्टमंडळाने कार्यक्रमात येण्याचे दिले निमंत्रण

बीड।एस.एम.न्युज़ 

येत्या ३१ जुलै २०२६ रोजी सुप्रसिद्ध आणि अजरामर पार्श्वगायक मुहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात येणाऱ्या एक शाम मुहम्मद रफी साहब के नाम या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता बीडच्या गायक कलाकारांच्या शिष्टमंडळाने मुहम्मद रफी यांचे सुपुत्र शाहिद रफी यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण दिले.
                शाहिद रफी हे त्यांच्या ऑर्केस्ट्रा सोबत नुकतेच धुळे जिल्ह्याच्या मालेगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा बीडहून गायक एम.एम.शेख, ज्येष्ठ संगीत विशारद मज़हरुद्दीन शेख, मुजीब शेख, सैलानी शेख आणि बीड जिल्हा परिषदेतील अधिकारी युसूफ़ खान पठाण हे त्यांची भेट घेण्याकरिता गेले होते. तिथे सर्वांनी शाहिद रफी यांची भेट घेत त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मुहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने ३१ जुलै रोजी एक शाम मुहम्मद रफी साहब के नाम हा कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. यावेळी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आपण आवर्जून यावे अशी विनंती केली.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत