अम्मी का ध्यान रखना; ना. पंकजाताईंकडून मदतीसह मातृत्वाचा सल्ला
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्ण
मरहूम हाजी एजाज़ देशमुख यांच्या कुटुंबियांना ५लाखांचा धनादेश सुपूर्द
सलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
बीड (एस.एम.न्युज़) - राज्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज़ देशमुख यांच्या निधनानंतर बीड येथे झालेला शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी दिनी ना. पंकजाताईंनी गोपीनाथ गडावरून हा शब्द पूर्ण करत दिवंगत हाजी एजाज़ देशमुख यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपुर्द केला. दिवंगत एजाज़ देशमुख यांच्या मुलाच्या हाती धनादेश देत बेटा, "अम्मी का ध्यान रखना" असा सल्ला देत ना. पंकजाताईंनी देशमुख कुटुंबियाप्रती असलेला स्नेह दाखवून दिला. देशमुख कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी भाजपचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी पाठपुरावा करत गोपीनाथराव मुंडे साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत मिळवून दिली.
परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर बुधवार दिनांक ३ जून २०२६ रोजी दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्याच्या पशू संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज़ देशमुख यांच्या कुटुंबीयांना ५लाख रुपये मदतीचा धनादेश सुपुर्द केला. दिवंगत हाजी एजाज़ देशमुख यांच्या पत्नीच्या नावे असलेला धनादेश त्यांच्या मुलाच्या हाती देत पंकजाताईंनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे देशमुख कुटुंबीयांची ख्याली-खुशाली विचारत आईची काळजी घे असा मायेचा सल्ला हाजी एजाज़ देशमुख यांच्या मुलाला दिला. हाजी एजाज़ देशमुख हे मुंडे साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अविस्मरणीय योगदान दिलेले आहे. याची जाणीव ठेवत पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मदत देशमुख कुटुंबीयांना दिली. बीड येथे भाजप प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांच्या पुढाकारातून झालेल्या शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांना ५लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. ताईंनी दिलेला शब्द आज गोपीनाथ गडावरून मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी दिनी पूर्ण केला. यावेळी भाजप नेत्या डॉ. प्रितमताई मुंडे, आ. नमिताताई मुंदडा यांच्यासह भाजपचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर, इर्शाद देशमुख, जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, शेख फारुक, नूरलाला खान, जिया शेख, आमेर काज़ी, आमू सय्यद आदींची उपस्थिती होती.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा