वाह रे जीगरा! अशी फाड-फाड चिरफाड करायला खूप मोठा जीगरा लागतो!
वाह रे जीगरा! अशी फाड-फाड चिरफाड करायला खूप मोठा जीगरा लागतो अन् ते तुमच्याकडे असल्याचे तुम्ही दाखवून दिले. यापूर्वीच्या अंकाच्या बातमीवर या बातमीने कळस चढविला संपादक महोदय.
आजच कोणत्यातरी वृत्तपत्रात एक पत्रकार म्हणतोय की, सत्य वस्तुस्थिती मांडणारे बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार "षंढ" झालेत मात्र आज दिवस मावळत नाही तोच "सायं. दैनिक दृष्टिकोन न्यूज" मध्ये "संपादक अजय उर्फ राजू जोगदंड" यांनी लिहिलेली ही परखड बातमी दाखवून देते की, बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्यासारखे "मर्द संपादक" आजही कार्यरत आहेत.
- एस.एम.न्युज़
भय इथले हे संपत नाही.....गोवंश हत्या बंदी कायदा बनला अंमलदारांसाठी कुरण?केवळ मुस्लिम लक्ष्यामुळे पशुधन मालकांची होऊ लागली आर्थिक पिळवणूक
संशयाची टांगती तलवार आणि जीवाच्या जोखमीमुळे पशुधनाकडे मुस्लिम शेतकरी-व्यापार्यांनी फिरवली पाठ!
विदेशात बीफची निर्यात करणार्या त्या कत्तलखान्यांवर मेहरबानी कोणाची?
द्वेष पसरविण्यामागे कोणाचे दडलेय हित, गोरगरीब हिंदु-मुस्लिमांचा सवाल
बीड।राजू जोगदंड
मोठ्यांचा आला गाडा अन् गरीबांचे घर पाडा या म्हणीप्रमाणे सध्याची महाराष्ट्रासह देशाची स्थिती आहे. त्यामुळे भय इथले हे संपत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गोवंश हत्या बंदीचा कायदा पारीत झाल्यापासून आजवर केवळ एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन यातून जनमनात द्वेषाचे बीज पेरले जात आहे. त्यामुळे समाजातील एकोपा-बंधुभाव याला छेद मिळत असून यातून नेमके कोणाचे हित दडलेय हा एक संशोधनाचा वेगळा विषय आहे. मात्र तत्पूर्वी गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजवाणीच्या नावाखाली अंमलदार आणि ठेकेदारांसाठी हे कुरण बनल्याचे चित्र सध्या दिसते. संशयाची टांगती तलवार-जीवाची जोखीम आणि होणार्या आर्थिक पिळवणूकीमुळे पशुधन मालक मुस्लिम शेतकरी व व्यापारी जनावरांच्या व्यवहाराकडे पाठ फिरवू लागल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होऊ लागला आहे. परंतु विदेशात बीफ निर्यात करणार्या हिंदूंच्या बड्या कत्तलखान्यांवर मेहरबानी कोणाची आहे? त्याठिकाणी नेमकी कोणत्या वंशाच्या जनावरांची आणि कोणाच्या कृपेने सरेआम कत्तल करुन हे मांस विदेशात निर्यात केले जाते? असे संतप्त सवाल महाराष्ट्रातील गोरगरीबांमधून उपस्थित केले जात आहे.
सन १९९५ मध्ये युती सरकारने गोवंश (बैल, वळू, वासरू) हत्याबंदीचे विधेयक संमत केले होते. परंतु ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित होते. अखेर ४ मार्च २०१५ रोजी हे सुधारित विधेयक राष्ट्रपतींच्या मान्यतेने लागू झाले. या कायद्यामुळे गायी सोबतच बैल, वळू आणि वासरांच्या हत्या, मांस विक्री आणि बाळगण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकण्यात आले. परंतु गायी सोबतच बैल, वळू आणि वासरांची वाहतूक किंवा हत्या, मांस विक्री आणि बाळगण्याच्या संशयातून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडतायेत. या पार्श्वभूमीवर आता धार्मिक राजकारणाने डोके वर काढले असून या व्यवसायात विशिष्ट धर्माचेच लोक काम करतात का? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साधारणपणे गोमांस निर्यात करणारा समूह मुस्लिम धर्माशी संबंधित असतो, असा समज झाला आहे. मात्र, यासंबंधी नुकतीच एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात 10 मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती पूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. मात्र गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली अंमलदार आणि ठेकेदार कोणतीही खातरजमा न करता रोखठोक कारवाई करत असून गोरगरीबांची मात्र कुठेच दाद ना फिर्याद अशी स्थिती असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. परंतु, यामुळे अंमलदार मात्र संधीचे सोनं करण्यासाठी आर्थिक उन्नती करु लागल्याचे चित्र आहे. संशयाची टांगती तलवार-जीवाची जोखीम आणि होणार्या आर्थिक पिळवणूकीमुळे पशुधन मालक मुस्लिम शेतकरी व व्यापारी जनावरांच्या व्यवहाराकडे पाठ फिरवू लागल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होत असतांना खुलेआमपणे विदेशात केली जाणारी निर्यात आणि इथे असलेल्या इस्लामीक खानावळींकडे कानाडोळा का केला जातोय? हेच न उलगडणारे कोडे महाराष्ट्राला पडले असून राज्याच्या अन्न औषधी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कोडे सोडविणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा खर्या अर्थाने लागू होणार की, लोकांना येड्यात काढून राजकीय पोळी भाजण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला जाणार हा गंभीर प्रश्न आहे.
*तुकाराम मुंढेंमुळे अन्न भेसळ विभाग ॲक्शन मोडवर*
अन्न भेसळ विभाग अॅक्शन मोडवर असून राज्यात भेसळयुक्त साठ्यांवर धाडी टाकल्या जात असल्याने भेसळबाजांच्या उरात धडकी भरली आहे. शिवाय गुटखा माफिया आणि खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणारे तसेच खानावळी चालवणारे देखील अन्न भेसळचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडावर आहेत. राज्यात गोवंश बंदी कायदा असतांना मात्र बेकायदा कत्तलखाने व गोमांस विक्री सर्रासपणे केली जाते. शिवाय इस्लामिक खानावळीत येणारे बीफ कुठले असा सवाल उपस्थित होत असून या खानावळींची कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे साहेब झाडाझडती घेणार का? हाच प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
*भारतातून होणारी मांसाची निर्यात बंद करावी*
देशातील कत्तलखाने सरसकट बंद करुन विदेशात निर्यात होणार्या मांसवर पूर्णत: बंदी घालण्यात यावी. कारण देशातंर्गत कत्तलखाने व मांस विक्रीच्या कळीच्या मुद्यावरुन समाजात वितुष्ट पसरुन तणावाचे वातावरण निर्माण होत असतांना विदेशात मात्र बिनदिक्तपणे मोठ्या प्रमाणात मांसाची निर्यात केली जात आहे. हे मांस कश्याचे आणि कत्तलखाने कोणाचे आहेत? यावर पूर्णत: बंदी घालण्यासाठी कोणाचा कंठ फुटत नाही. मात्र दुसरीकडे देशांतर्गत राजकीय पोळी भाजण्यासाठी विशिष्ट समाजाला टार्गेट केले जाते हे कितपत नैतिकतेला धरुन आहे? याचा विचार प्रत्येकाने करणे क्रमप्राप्त: आहे. अशी चर्चा सध्या सामान्यांत होत आहे.
*या यादीवर नजर टाका, कुठं पाणी मुरतंय लक्षात येईल*
अल् कबीर हा देशातील सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात आहे. सतीश सब्बरवाल हे या तब्बल ४०० एकरांच्या परिसरात पसरलेल्या कत्तलखान्याचे मालक आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात अल् कबीरचे मुख्यालय असून या कत्तलखान्यातून अनेक आखाती देशांमध्ये गोमांसाची निर्यात केली जाते. तसेच अरेबियन एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील कपूर असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. अरेबियन एक्स्पोर्टसकडून गोमांसाबरोबर मेंढ्याचे मांसही निर्यात केले जाते. अरेबियन एक्स्पोर्टसच्या संचालक मंडळात विरनत नागनाथ कुडमुले, विकास मारूती शिंदे आणि अशोक नारंग यांचा समावेश आहे. शिवाय
भारतामधील बीफच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असलेल्या एमकेआर फ्रोजन फूड एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मदन एबट आहेत. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. या कंपनीचा कत्तलखाना पंजाबच्या मोहालीत असून या सनी एबट एमकेआर एक्स्पोर्टसचे संचालक आहेत. शिवाय सुनील सूद यांच्या मालकीच्या अल् नूर एक्स्पोर्टसचे मुख्यालय दिल्लीत आहे. मात्र, यांचा कत्तलखाना आणि मांस पक्रिया केंद्र उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये स्थित आहे. मेरठ आणि मुंबईमध्ये अल् नूर एक्स्पोर्टसच्या शाखा आहेत. एओवी एक्स्पोर्टसचा कत्तलखाना उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये आहे. याठिकाणी कंपनीचे मांस प्रक्रिया केंद्रही आहे. एओवी एक्स्पोर्टस मुख्यत्त्वेकरून बीफची निर्यात केली जाते. अभिषेक अरोरा हे एओवी एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.
तसेच कमल वर्मा हे स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. तर एस. सस्ति कुमार हे पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस संचालक आहे. अश्विनी अॅग्रो प्रॉडक्टसचा कत्तलखाना तामिळनाडूच्या गांधीनगरमध्ये असून या कंपनीचे संचालक के. राजेंद्रन आहेत. तसेच महाराष्ट्राच्या फलटणमध्ये महाराष्ट्र फुड प्रोसेसिंग अँण्ड कोल्ड स्टोरेजचा कत्तलखाना असून सनी खट्टर या कंपनीतील भागीदार आहेत.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा