Breaking News

एक निष्ठतेचे फळ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी रहेमत पठाण यांची नियुक्ती

एक निष्ठतेचे फळ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी रहेमत पठाण यांची नियुक्ती

बीड (एस.एम.न्युज़) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवकांमध्ये लोकप्रिय असलेले रहेमत पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शहरातील अल्पसंख्याक समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
                   रहेमत पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, युवकांच्या समस्यांसाठी आवाज उठवणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
                    या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष निजाम शेख, बीड शहराध्यक्ष शेख शाकीर तसेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रहेमत पठाण यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                 यावेळी रहेमत पठाण म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व रोजगाराच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून बीड शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे."
                तसेच त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत, "पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वाहिनी अजितदादा पवार, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन," असे सांगितले.
                   रहेमत पठाण यांच्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड शहरात अधिक बळ मिळणार असून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत