Breaking News

बीड नगर परिषदने वसुली विभाग तिसऱ्या वरून पहिल्या मजल्यावर हलविला आता कर भरणे झाले सुसह्य; पण..... - रमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़

बीड नगर परिषदने वसुली विभाग तिसऱ्या वरून पहिल्या मजल्यावर हलविला

आता कर भरणे झाले सुसह्य; पण..... - रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

येथील बीड नगर परिषदेचा वसुली विभाग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होता. यामुळे विविध कर भरणा करण्यासाठी जाणाऱ्या बीड शहरवासियांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत होती. ज्येष्ठ नागरिकांसह रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार सारखे आजार असलेल्यांचा तर जमिनीपासून तिसऱ्या मजल्यापर्यंत पायऱ्या चढून जाताना अक्षरशः जीव दावणीला लागायचा. ही बाब पाहता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिनांक ०४ जून २०२५ रोजी याविषयी दिलेल्या निवेदनातून सविस्तर मुद्दा मांडत वसुली विभाग तिसऱ्या मजल्यावरून खालच्या पहिल्या मजल्यावर आणावा अशी मागणी करून हा प्रश्न प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा मांडला होता. याची दखल घेत बीड नगर परिषदेने उशिराने का होईना वसुली विभाग तिसऱ्या वरून पहिल्या मजल्यावर हलविल्याने कर भरणा करण्यासाठी जाणाऱ्या बीड शहरवासीयांना आता या विभागात ये-जा करणे सुसह्य झाले असले तरी इमारतीच्या दर्शनी भागात याची सूचना न लावल्याने कर भरणा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची पायपीट होत आहे. असे मनोगत या मुद्द्याकडे निवेदनाच्या माध्यमातून सर्वप्रथम लक्ष वेधणारे रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
                    याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड नगर परिषदेने वसुली विभाग तिसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर हलविला असला तरी याची माहिती बऱ्याच जणांना नसल्याने अजूनही कर भरणा करण्यासाठी आलेले नागरिक पूर्वीच्या म्हणजे थेट तिसऱ्या मजल्यावरील दालनात जात असल्याचे दिसत आहे.
            कारण वसुली विभाग हलविल्याची सूचना इमारतीच्या दर्शनी भागात लावलेली नाही. जिथे वसुली विभाग सुरू करण्यात आला आहे त्या दालनाच्या प्रवेशद्वारावरही चांगल्या मोठ्या अक्षरात नाव न लिहिता एका पांढऱ्या कागदावर बारीक अक्षरात वसुली विभाग नाव लिहून ते कागद दारावर आणि दाराच्या भिंतीवर डकविण्यात आले आहे. जे सहसा नागरिकांच्या नजरेस पडत नसल्याने कर भरणा करण्यासाठी आलेले नागरिक थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन परत खालच्या मजल्यावर येत असल्याचे चित्र दररोज दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट होत आहे.
               म्हणून वसुली विभागाच्या दारावरील भिंतीवर रंगाने मोठ्या अक्षरात वसुली विभागाचे नाव लिहिणे आवश्यक आहे. सध्या या दालनाला "एल २" हा नंबर देण्यात आलेला आहे.
             तरी कर भरणा करण्यासाठी बीड नगर परिषदेत जाणाऱ्या नागरिकांनी आता तिसऱ्या मजल्यावर न जाता पहिल्याच मजल्यावर नगराध्यक्षांच्या दालना शेजारी असलेल्या वसुली विभागात जाऊन कर भरणा करावा असे आवाहनही या निमित्ताने रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत