Breaking News

लोकहो, यांना लक्षात ठेवा ते तुमच्या आरोग्याशी खेळत आहेत

लोकहो, यांना लक्षात ठेवा ते तुमच्या आरोग्याशी खेळत आहेत

अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेताच धडाकेबाज कारवाया करण्याचा लावलेला सपाटा बघून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने बंद ठेवण्यात आलेले हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाचे हातगाडे, दूध पुडे विकणाऱ्यांना लक्षात ठेवा ते तुमच्या आरोग्याशी खेळत आहेत.
                  वर उल्लेख केलेले अनेक व्यावसायिक इमान-इतबारे व्यवसाय करत नसल्याने त्यांनी मुंढे साहेबांच्या धास्तीने आपआपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. याचा सरळ अर्थ निघतो की, व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असलेले निकष ते पाळत नाहीत.
                  अनेक हॉटेल्स मध्ये वापरले जाणारे तेल, दूध आणि अन्य पदार्थ यात गडबड असते तर भरमसाठ संख्येने वाढलेल्या मिठाईच्या दुकानात मिळणारे गोड खाद्यपदार्थ हे खरेच दुधापासून तयार केले जातात का? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरीत आहे.
              असाच प्रकार मोठ्या संख्येने अतिक्रमणांच्या जागी टाकण्यात आलेल्या चहाच्या हातगाड्यांबाबत आहे. त्यांच्याकडे येणारे दूध हे दूधच असते का? ते स्वच्छतेचे निकष पाळतात का? याबाबतीतही कुणाला गांभीर्य नाही.
                   अशीच अवस्था रस्त्यांवर अतिक्रमण करत थाटात टेबल-खुर्च्या टाकून नाव, गाव नसलेल्या आरसपाणी प्लास्टिक पिशव्यांमध्ये दूध विकणाऱ्या व्यावसायिकांची आहे. तेही दूध म्हणून विकत असलेले तरल पदार्थ नक्की दूधच आहे का? याचेही कुणाला देणे-घेणे असल्याचे दिसत नाही.
                      हे सर्व व्यवसाय दूध या पदार्थाशी निगडित आहे. पूर्वीच्या काळात जिथे दूध दुभत्याचा व्यवसाय करणारे शेतकरी मोठ्या संख्येने होते. लोकसंख्या माफक होती. तरीसुद्धा गाव-खेडे असो की शहरे, तिथे सकाळच्या नंतर दूध मिळायचे नाही. तेव्हा हॉटेल्स, चहाचे हातगाडे, मिठाईची दुकाने सुद्धा अत्यंत कमी संख्येत होती. अलीकडच्या काळात दूध दुभत्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाली आहे. शेती करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. लोकसंख्या मात्र भरमसाठ वाढली आहे. हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाचे हात गाडे, दूध पुडे विकणाऱ्यांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास प्रश्न पडतो की, या सर्वासाठी मुख्य घटक पदार्थ असलेले दूध एवढ्या मोठ्या मुबलक प्रमाणात कसे उपलब्ध होऊ लागले? तर यात शंभर टक्के काळेबेरे असल्याची बाब सहज लक्षात येते.
                 याकडे मात्र ना शासन-प्रशासनाचे लक्ष आहे, ना जनतेचे. व्यवसाय करणारे जिथे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत, तिथे जनता ही दुर्लक्ष करून त्यांना आपल्या आरोग्याशी खेळू देत आहे.
                 आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखा खमक्या अधिकारी या विभागाला मिळताच त्यांनी आपल्या स्टाईलने जेव्हा धडाकेबाज कार्य करायला सुरुवात केली, तेव्हा वर उल्लेख केलेल्या अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून संभाव्य कारवाईतून वाचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
                तेव्हा लोकहो, अशा व्यावसायिकांना लक्षात ठेवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण असे व्यावसायिक तुमच्या आरोग्याशी खेळत आहेत.

लेखन - एस.एम.युसूफ़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत