Breaking News

मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना वसुली विभागाच्या स्थलांतरमुळे आभारपत्र सूचनाफलकासाठी रमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांनी केली सूचना

मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना वसुली विभागाच्या स्थलांतरमुळे आभारपत्र

सूचनाफलकासाठी रमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांनी केली सूचना

बीड।एस.एम.न्युज़

बीड नगर परिषदेच्या वसुली विभागाचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी कर्तव्यदक्षता दाखवून तिसऱ्या मजल्यावरून वसुली विभागाचे पहिल्या मजल्यावर स्थलांतर केल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेश गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्यांना आभारपत्र देत आता बीड नगरपरिषद इमारतीच्या दर्शनी भागात याचे सूचनाफलक लावून दालना बाहेरील भिंतीवर ठळक रंगाने वसुली विभागाचे नाव लिहावे अशी सूचना ही दिलेल्या आभारपत्रातून केली आहे.
                  यावेळी बोलताना मुख्याधिकारी फडसे म्हणाले, नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दर्शनी भागात सूचनाफलक लावायचाच आहे. वसुली विभागाच्या दारावरील भिंतीवर सुद्धा मोठ्या अक्षरात लिहिणार आहे. तसेच वसुली विभागाच्या दालनात असलेल्या प्रत्येक काऊंटर समोरील काचेवर कोणत्या प्रभागाचा कोणत्या काउंटरवर कर भरणा करू शकतात ते सुद्धा नमूद करणार असल्याचे म्हटले. अशी माहिती आभारपत्र देणारे रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.युसूफ़ यांनी दिली आहे.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत