Breaking News

गोवंशियांसाठी डॉ. गणेश ढवळे एक मराठा लाख मराठा प्रमाणे सिद्ध होतील का?

गोवंशियांसाठी डॉ. गणेश ढवळे एक मराठा लाख मराठा प्रमाणे सिद्ध होतील का?

देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड।एस.एम.न्युज़
देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, देशातील सर्व कत्तलखाने बंद करावेत, मांस निर्यातीवर बंदी घालावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधानाच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी, या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. ८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करत गोसंवर्धन, पशुधन व्यवस्थापन आणि शेतकरी हिताचे दीर्घकालीन धोरण राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यांचा होता आंदोलनात समावेश

आंदोलनात अँड. शेख शफीक भाऊ, शेख युनुस, शेख मुबीन,  मुस्ताक शेख, सय्यद सादेक, रामधन जमाले, हनुमान घोडके,भीमराव कुटे, बाजीराव ढाकणे, डॉ. संजय तांदळे, सरफराज खान, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, अमर शेख, सय्यद अब्दुल करीम आदी सहभागी झाले होते.

या आहेत प्रमुख मागण्या

१) देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे.
२)देशातील सर्व कत्तलखाने सरसकट बंद करण्यात यावेत.
३) विदेशात होणाऱ्या मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी.
४) गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधान व कायद्याच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी.
५) मांस व्यवसाय व मांस निर्यात क्षेत्रात कार्यरत उद्योगांसाठी एकसमान व पारदर्शक धोरण लागू करावे.
६)गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही समाजघटकाला लक्ष्य न करता सर्वांना समान व निःपक्ष न्याय द्यावा.
७) पशुधन व्यवस्थापन, गोसंवर्धन, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे दीर्घकालीन धोरण राबवावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

एक मराठा लाख मराठा

गेल्या काही काळापासून विविध कट्टरवादी हिंदू संघटनांनी गोवंशीय प्राण्यांबद्दल मुस्लिम समाजाविरुद्ध सातत्याने नको ते पाऊल उचलून काहीबाही कारवाया केल्या आहेत व करत आहेत. यामुळे मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. असे असूनही मुस्लिम समाज एकसंध नसल्याने तो वेगवेगळ्या राजकीय पक्षात विखुरला गेला आहे. त्रास देणाऱ्या संघटनांना अभय देणाऱ्या पाठीशी घालणाऱ्या भाजपमध्ये सुद्धा बरेच मुस्लिम कार्यकर्ते (नेते नव्हेत) आणि पदाधिकारी आहेत. यामुळे मुस्लिम समाजावर कितीही अन्याय झाला तरीही त्याविरुद्ध समाज चवताळून उठत नाही, विरोध करत नाही. यामुळे कट्टरवादी हिंदु संघटनांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असून मारहाणी पासून ते जीव घेण्यापर्यंत कट्टरवादी माथेफिरूंची मजल गेली आहे. यामुळे फक्त मुस्लिम समाजालाच सर्व प्रकारचे नुकसान सोसावे लागते असे नाही तर अशा प्रसंगांमुळे देशातील सामाजिक वातावरण ही देशोधडीला लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाची छबी खराब होत आहे. ही बाब हेरून धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे मराठा असूनही त्यांनी गोवंशीय प्राण्यांसाठी आवाज बुलंद केल्याने ते आता एक मराठा लाख मराठा ठरू शकतील का? याची उत्सुकता समाजात लागून राहिली आहे.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत