कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित
बीड (एस.एम.न्युज़) - येथील जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना उत्कृष्ट पोलीस सेवा, सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा याची दखल घेत पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा दि.17 मे 2026 रविवार रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पद्मपाणि पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत विजय जाधवर व सपत्नीक अलका विजय जाधवर यांना प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर एएचटीओच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पद्मपाणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे, माजी मुख्याध्यापक हौसराव पवार, जिल्हा वाहतुक शाखेचे यापुर्वीचे बीडचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप, नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती आरती रंजीत बनसोडे, भागवत तावरे, आत्माराम वाव्हळ, साहित्यिक विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करतांना पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर म्हणाले की, नौकरी सुरु केल्यावर आई-वडील आणि गुरुंकडून मिळालेले संस्कार जे की देवाला, धर्माला, कर्माला आणि नशिबाला या प्रमाणे आजपर्यंत मी 36 वर्ष नोकरी केली. एक अनुभव इतका थरारक होता की तो मी आणि माझ्यासोबत असलेले सहकारी निवृत्त स.पो.उपनि नाईकवाडे चालक हे कधीच विसरु शकत नाहीत तो असा की, 1999 सालची एक घटना विशेष उल्लेखनीय ठरते. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पाठक यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असताना नांदेड जिल्ह्यातील मंगरुळ घाटात ट्रक लुटीची घटना घडली होती. बिनतारी संदेशाद्वारे माहिती मिळताच विजय जाधवर व सहकारी चालक नाईकवाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड येथे तात्काळ कारवाई करत तीन पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त करून दोन आरोपींना अटक केली आणि आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल तत्कालीन पालकमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक आणि रोख 2500 रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या काळात आमचा पोलीस कर्मचार्यांचा पगार हा केवळ 10 हजार रुपये होता परंतू या धाडसी कामगिरीमुळे मला रोख स्वरुपात 2500/- रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्रक तत्कालीन पालकमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते दिले होते. या रक्कमेला त्या काळात त्या काळात लाखांची किंमत होती परंतू त्या रक्कमेला आजही माझ्या आयुष्यात करोडो रुपयांपुढे देखील तोड नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा