Breaking News

देशी गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्या सर्वधर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन

देशी गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्वधर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन

बीड।एस.एम.न्युज़
देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.  सदरील निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे.
            याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारत देश हा विविध संस्कृती आणि परंपरांचा संगम असून गाईला विशेष धार्मिक, सामाजिक व आर्थिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात गाईला ‘गोमाता’ म्हणून पूजनीय स्थान आहे. याशिवाय शेती व्यवस्थेतही गाईचे मोठे योगदान असून, शेणखत व गोमूत्र सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरते. दुग्धउत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.
          देशी गाईंची संख्या घटत चालल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा दिल्यास संवर्धनासाठी प्रभावी धोरणे राबविता येतील आणि जनजागृतीही वाढेल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
          दरम्यान जर्सी व इतर मिश्रित जातींच्या जनावरांची उत्पादकता कमी झाल्यानंतर त्यांचे पालन करणे पशुपालकांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा निरुपयोगी किंवा कमी उत्पादनक्षम जनावरांच्या बाबतीत, विद्यमान कायद्यांच्या चौकटीत राहून आणि पशू कल्याणाचे नियम पाळून, त्यांच्या कायदेशीर कत्तलीस परवानगी देण्यासाठी स्पष्ट धोरण आखावे, अशी मागणी शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे.
          यावेळी पत्रकार पठाण अमरजान, बीड शहर बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायभाय, नदीम शेख, पत्रकार मुस्तफा पठाण, पाशाभाई शेख, अशोक वडमारे, राम मार्कंडे, सलमान शेख, शकील शेख, फेरोज शेख, रियाज शेख यांच्यासह वेगवेगळ्या जाती धर्मातील इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत