उर्दू शिक्षणाच्या प्रश्नांवर निर्णायक पावले उचलणार - शिक्षणाधिकारी (प्रा.) मयुरेश मोरे
उर्दू शिक्षणाच्या प्रश्नांवर निर्णायक पावले उचलणार - शिक्षणाधिकारी (प्रा.) मयुरेश मोरे
अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचा पुढाकार; उर्दू शाळांच्या विकासासाठी मागण्यांचा पाठपुरावा
बीड (एस.एम.न्युज़) - अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मयुरेश मोरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी उर्दू माध्यमाच्या शाळांशी संबंधित विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनावर शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांनी सकारात्मक चर्चा करत उर्दू शाळांच्या विविध समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले. संघटनेच्या वतीने सेवाज्येष्ठता यादी, पदोन्नती प्रक्रिया, माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे भरणे, पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करणे, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबविणे, तसेच जिल्ह्यातील निजामकालीन इमारतींसाठी अनुदान उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद, कार्याध्यक्ष उस्मान खान, कोषाध्यक्ष मोमीन अलीम, जिल्हा सहसचिव मोमीन जावेद, तालुकाध्यक्ष मोमीन खैसर, केंद्रप्रमुख सय्यद इद्रिस, तसेच महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे माजेद अहमद, खान अनवर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा