रामानुजन अकॅडमीच्या यशामागील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सौ. दीपीका अजितकुमार यादव
रामानुजन अकॅडमीच्या यशामागील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सौ. दीपीका अजितकुमार यादव
पद्मपाणि राज्यस्तरीय नावलौकिक पुरस्काराने सन्मानित
बीड।एस.एम.न्युज़
शैक्षणिक क्षेत्रात आपल्या समर्पित कार्याने आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अपार जिव्हाळ्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौ. दीपीका अजितकुमार यादव या सध्या रामानुजन अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अंबिका चौक, बीड येथे संचालक म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.
सौ. दीपीका यादव यांनी आपले डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शिक्षण वाय.सी.आय.पी. पॉलिटेक्निक कॉलेज, बीड येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम.आय.आय.टी. कॉलेज, बीड येथून बी.सी.एस. तसेच एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स ही पदवी संपादन केली. उत्कृष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीसोबतच त्यांनी शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये तब्बल ८ वर्षांचा अध्यापन अनुभव मिळवला आहे.
गणित आणि इंग्रजी या विषयांवरील त्यांची मजबूत पकड विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभदायक ठरत आहे. त्या मॅथ्स आणि इंग्रजी हे विषय प्रभावी पद्धतीने शिकवतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक विकासाचीही त्या प्रत्येक स्तरावर काळजी घेतात. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि आत्मविश्वास देणे ही त्यांची खासियत आहे.
सन २०२१ पासून त्या रामानुजन अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीने दरवर्षी उल्लेखनीय आणि आकर्षक यश संपादन केले आहे. रामानुजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय यशाची परंपरा निर्माण केली आहे.
अकॅडमीमधील २५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शाहू स्क्रीनिंग, लातूर येथे निवड झाली असून, अनेक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमध्ये पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. तसेच अकॅडमीच्या ॲडव्हान्स फाउंडेशन कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी ए.आय.आय.एम.एस., आय.आय.टी., एन.आय.टी. तसेच इतर उच्च दर्जाच्या शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी संस्थांमध्ये यशस्वी प्रवेश मिळवून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
विद्यार्थीकेंद्रीत दृष्टीकोन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण निकाल यामुळे सौ. दीपीका अजित कुमार यादव या आज बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी नाव बनल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रामानुजन अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही संस्था विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावीपणे कार्यरत असून, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धात्मक शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या सोबतच त्या इतर सामाजिक कार्यात सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने कार्यरत आहेत. त्यांच्या अशाच कार्याची दखल घेऊन पद्मपाणि प्रतिष्ठानने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत पूर्ण शिक्षणरत्न पुरस्कार तथा उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार - २०२६ देऊन सन्मानित केले. यामुळे शिक्षण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या हातून यापुढेही उत्तमोत्तम कार्य घडो अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा