Breaking News

भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून गळ्यात जमिनीपर्यंत लोंबकळणारे बांबूंचे दांडूके बांधा

भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून गळ्यात जमिनीपर्यंत लोंबकळणारे बांबूंचे दांडूके बांधा

एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन

बीड।एस.एम.न्युज़
भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या गळ्यात जमिनीपर्यंत लोंबकळणारे बांबूंचे दांडूके बांधा अशी मागणी करणारे निवेदन दैनिक जनमंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी बीड नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
                   याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरामध्ये संपूर्ण शहरभरात मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा उपद्व्याप वाढला आहे. त्यांच्या प्रचंड संख्येत असलेल्या टोळक्यांनी आतापर्यंत आबालवृद्धांसह अनेक नागरिकांवर हल्ले करून जबर जखमी केले आहे. संपूर्ण बीड शहरात मुख्य रस्ते असो की, उप रस्ते की, गल्लीबोळ कुठेही भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे कोणत्याही रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
             आतापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्यास बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. प्रथम जाहीर केलेले भटक्या कुत्र्यांना पकडून शहराबाहेर दूर नेऊन सोडण्याचे कार्य काही झाले नाही. त्यानंतर भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे नसबंदी अर्थातच निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा करण्यात आली नाही.
                 म्हणून आता  संपूर्ण बीड शहरासह बीड जिल्ह्यातील एकूण एक भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या गळ्यात जमिनीपर्यंत लोंबकळणारे बांबूंचे दांडूके बांधण्यात यावेत. जेणेकरून भटके कुत्रे धावून नागरिकांच्या अंगावर जाणार नाहीत. धावायचे असल्यास गळ्यात बांधलेले दांडूके तोंडात धरून पळावे लागते. पर्यायाने ते नागरिकांना चावून जखमी करू शकणार नाहीत. म्हणून आता बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यामधील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून गळ्यात जमिनीपर्यंत लोंबकळणारे बांबूंचे दांडूके बांधण्याची मोहीम हाती घ्यावी. अशी मागणी करणारे निवेदन एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत