स्वस्त धान्य दुकानदारावर भीमा टुले भीम सारखा तुटून पडला मारहाणीसह जीवे मारण्याची धमकी; दुकानदाराची संघटनेच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारीकडे धाव
स्वस्त धान्य दुकानदारावर भीमा टुले भीम सारखा तुटून पडला
मारहाणीसह जीवे मारण्याची धमकी; दुकानदाराची संघटनेच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारीकडे धाव
बीड।एस.एम.न्युज़
स्वस्त धान्य दुकानदार म्हटले की, त्यांना कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा अनुभव कधी ना कधी येतोच येतो. असाच एक प्रकार जिल्ह्यातील नवगण राजुरी या गावात विजय काळे यांच्या स्वस्त धान्य दुकानात घडला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी या गावात स्वस्त धान्य दुकान असलेले राशन दुकानदार विजय काळे यांच्या दुकानावर ते दर महिन्यासारखे नियमाप्रमाणे मशीन मधून धान्य वाटप करत असताना गावातील भीमा लक्ष्मण टुले हा व्यक्ती दुकानात गेला व त्याने विजय काळे यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे भीमा टुले या व्यक्तीकडे ए.पी.एल. शेतकरी या योजनेचे रेशन कार्ड असल्याने तो या योजनेचा लाभार्थी आहे. त्या योजनेत कार्डधारकाला धान्य मिळत नाही. म्हणून त्याने याचा राग काढत स्वस्त धान्य दुकानदार विजय काळे यांच्याशी भांडण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या दुकानातील मशीन व इतर साहित्य दुकाना बाहेर फेकून दिले. यामुळे साहित्याची टूट-फूट होऊन आर्थिक नुकसान ही झाले. याप्रकरणी विजय काळे यांनी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे या ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली शी संलग्न असलेल्या आणि माजी खासदार दत्ता मेघे मुख्य सल्लागार असलेल्या संघटनेचे निरीक्षक सुमित डोंगरे, परेश मोरे, विशाल इंगोले, परशुराम जाधव, फिरोज खान, अशोक फरताळे, मनोज दांगट, दिगंबर गर्जे, बी.एस. मसवले, रमेश गंगाधरे, कान्हा आखाडे, अनंता कुटे, शहादेव तांदळे, व्ही.एस. काळे, रामचंद्र लाटे, उल्हास रकटे, रामदास गाडे यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन लेखी तक्रार करत भीमा लक्ष्मण टुले याच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी केली. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे विवेक जॉन्सन या प्रकरणात आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा