Breaking News

लातूरच्या खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्राला आता "नीट" टाळे लागणार

लातूरच्या खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्राला आता "नीट" टाळे लागणारजिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी काढले लेखी आदेश

लातूर।एस.एम.न्युज़

"नीट" पेपर फुटीचे धागेदोरे लातूर शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्रापर्यंत येऊन कुलकर्णी, मोटेगावकर यासारखे अजून बरेच मोठे मासे गळाला लागल्यानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता लातूर येथील जिल्हा औद्योगिक केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी सुद्धा लातूरच्या औ‌द्योगिक वसाहत सहकारी संस्थेला लातूर इंडस्ट्रीयल इस्टेट को. ऑप. सोसायटी लि. लातूर येथील उत्पादन व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश काढले आहेत. यामुळे लातूरच्या खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्राला आता "नीट" टाळे लागणार असून "नीट* चे स्तोम माजवून फिक्सिंग करत आर्थिक दृष्ट्या गब्बर-डब्बर होऊन बसलेल्या करोडपती "नीट" करांवर यापुढे काय कारवाया होतील की, गेल्या वर्षी सारखेच यंदाही हे सर्व प्रकरण दाबून दडपून टाकण्यात येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
          याविषयी यापूर्वी मल्लिकार्जुन शिवलिंग भाईकट्टी व ॲड. प्रदिप मोरे यांच्याकडून दिनांक १२जुलै २०२३ व २६ जुलै २०२४ रोजी तक्रारी अर्ज देण्यात आले होते. या अनुषंगाने या कार्यालयामार्फत दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्देश देण्यात आले होते. पण त्यावर कारवाई काही झालेली नव्हती. अशा अवस्थेत यावर्षी पुन्हा एकदा नीट चा पेपर फुटला आणि त्यात नाना भानगडी बाहेर आल्या. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली "नीट" च्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या बाजारपेठेविषयी दिनांक २२ मे २०२६ शुक्रवार रोजी बैठक घेण्यात आली.
               या बैठकीत उपरोक्त विषयास अनुसरून लातूर चे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तक्रारदारांसोबत झालेल्या चर्चेप्रमाणे उ‌द्योग संचालनालय, मुंबई व आपल्या संस्थेमध्ये मुळ करारनाम्याप्रमाणे उत्पादना व्यतिरिक्त चालू असलेले सर्व व्यवसाय उदा. ट्यूशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग, हॉस्टेल, खानावळ, वस्तीगृह, अभ्यासिका, इतर छोटे-मोठे व्यवसाय तात्काळ स्वरुपाने तातडीने बंद करून, अनुपालन अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावा असे आदेश पारित करण्यात आले आहे.
                तसेच या आदेशाचे अनुपालन न झाल्यास आपल्या संस्थेवरती तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. असा इशाराही देण्यात आल्याने लातूर शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून यापुढे *नीट" च्या पेपर फुटी प्रकरणात अजून काय काय कारवाया होतात, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत