Breaking News

खरंच "युवा लोकमित्र" वृत्तपत्राने वस्तुस्थिती मांडली

खरंच "युवा लोकमित्र" वृत्तपत्राने वस्तुस्थिती मांडली - एस.एम.न्युज़

ईद-उल्-अज्हा तणावपूर्ण वातावरणात साजरी

मुस्लिमांची ईद, नियंत्रण कट्टरवादी संघटनांचे; शासन-प्रशासन हतबल!

बीड (प्रतिनिधी) - ईद-उल्-अज्हा म्हणजेच बकरी ईद काल दिनांक २८ मे २०२६ गुरुवार रोजी तणावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ईद जरी मुस्लिमांची असली तरी ती साजरी करण्यावर नियंत्रण मात्र कट्टरवादी संघटनांचे दिसून आले. याला कारणीभूत मात्र शासन-प्रशासन असल्याने कट्टरवाद्यांना त्यांनी मात्र मोकळे रान करून टाकल्याचे चित्रसुद्धा या ईदच्या वेळी स्पष्टपणे दिसून आले.

                 जेव्हापासून आपल्या भारत देशात फक्त गाईच नव्हे तर गोवंश हत्या बंदी कायदा विद्यमान केंद्र शासनाने लागू केला, तेव्हापासून ईद उल अज्हा वेळी कमी अधिक प्रमाणात कट्टरवादी संघटना डोके वर काढून शासन-प्रशासनावर कुरघोडी करत मुस्लिमांच्या या ईद मध्ये विर्जन घालण्याचे काम करीत आहेत. यावेळी ही ईद च्या काही दिवस अगोदर कायदा हातात घेतल्यासारखे आणि पोलिसांना आपल्या हातचे बाहुले बनविल्यासारखे पोलिसांसोबत येऊन मोमीनपुरा भागातील कुरेशी समाज वास्तव्यास असलेल्या मोहल्ल्यात मध्यरात्री कुलूपं तोडून जो काही धिंगाणा घातला त्यात वर्दीधारी पोलीस बुजगावणे झाल्यासारखे दिसून आले. हा सर्व प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेने डोळे उघडून पाहिला. तसाच तो शासन-प्रशासनानेही पाहिलाच परंतु या स्वयंघोषित कट्टरवादी संघटनांवर किंवा मध्यरात्री पोलिसांच्या बंदोबस्तात हल्ला करणाऱ्यांवर अद्याप पर्यंत शासन-प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे शासन-प्रशासन हतबल झाल्याचे तर कट्टरवाद्यांना मोकळे रान करून दिल्याचे? चित्र दिसून आले आहे.

ईद साजरी करण्यात झालेला बदल

काही काळापूर्वी म्हणजेच सन २०१४ अगोदर सण, त्यौहार, ईद कोणत्याही जाती धर्माचे असो ते सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने साजरे करायचे. एक दुसऱ्यांना भरभरून शुभेच्छा द्यायचे. आताही दसरा-दिवाळी असले तर मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शुभेच्छा देतातच. आणि हिंदू बांधवही रमजान ईद वेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात. शिवाय स्वतःची ईद साजरी करतानाही मुस्लिम बांधव हिंदू-मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा म्हणतात. मुस्लिमांची ईद असली तरी अगोदर हिंदू शब्दाला प्राधान्य दिले जाते. पण बकरी ईद आली की कट्टरवादी संघटना डोकेवर काढतात आणि हिंदू मुस्लिम भाई भाई, गंगा जमुनी तहजीब यासारख्या वाक्यांना तिलांजली देऊन आक्रमक होत कायदा हातात घेत नको ते उपद्रव माजवून ईद साजरी करण्यात विर्जन घालतात. ईद साजरी करण्यात झालेला हा बदल स्पष्ट दिसत आहे. यावर शासन-प्रशासनाचे कुठलेही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

शासन-प्रशासन कट्टरवाद्यांना पाठीशी घालू लागले?

ईद उल अज्हाच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा भागात कट्टरवादी संघटनांच्या माथेफिरूंनी जो काही धुळगुस घातला त्यावर शासन-प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने शासन-प्रशासन कट्टरवाद्यांना पाठीशी घालू लागले काय अशी शंका समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे .....

प्रतिस्पर्धेच्या या युगात संपूर्ण जगातील अनेक देश माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये सातत्याने पुढे जात आहेत. आपण आपल्या देशाला चांगल्यात चांगल्या प्रकारे कसे विकसित करू शकतो, याचा ध्यास घेऊन इतर देशांची सरकारे आणि तिथे राहणारा प्रत्येक नागरिक वाटचाल करीत आहेत. जनसंख्येत जगातील एक नंबर म्हटला जाणारा आपल्या शेजारील चीन हा देशच अफाट जनसंख्या असूनही विकसनशील दृष्टिकोन ठेवून एक मजबूत विकसित देश झाला आहे. त्या तुलनेत त्यांच्यापेक्षा कमी जनसंख्या असलेला आपला भारत आजही खूप मागास आहे. जिथे चीनमध्ये शाळा शिकणारी मुले सुद्धा शिक्षण घेता-घेता अनेक कामे किंवा छोटे-मोठे उद्योग करून अर्थार्जन करतात. तिथे आपल्या देशात मोठमोठ्या पदव्या मिळणाऱ्या तरुण-तरुणींना काम नाही, नोकऱ्या नाही, उद्योग धंदे करण्यासाठी भांडवल नाही. बेरोजगारी व महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे ना शासनकर्त्यांचे लक्ष आहे ना जनतेचे. त्यात पुन्हा हिंदू-मुस्लिम करून आपणच आपल्या देशाला विकसित देश होण्यापासून लांब घेऊन चाललो आहोत. म्हणूनच जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत हे खिन्न मनाने म्हणावे लागते.
*साभार - सा. युवा लोकमित्र*

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत