उद्योजक वैभव क्षीरसागर यांचा मानसेवी उपक्रम जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची मेजवानी
उद्योजक वैभव क्षीरसागर यांचा मानसेवी उपक्रम
जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची मेजवानी
बीड।एस.एम.न्युज़ - शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे युवा उद्योजक वैभव क्षीरसागर यांच्या वतीने भाजी मंडई परिसरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
उद्योजक वैभव क्षीरसागर व्यवसायातील व्यस्त वेळापत्रक असूनही ते सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात. चित्रपट पाहण्यासाठी लाभार्थ्यांची जिव्हाळा बेघर निवारा केंद्रापासून संतोषीमाता टॉकीजपर्यंत ने-आण करण्याची तसेच चहा-पाण्याची आस्थेवाईक व्यवस्था स्वतः लक्ष घालून करण्यात आली. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना मोठा आनंद मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
‘राजा शिवाजी’ चित्रपटातून लाभार्थ्यांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाल्याचे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजित वैद्य, मुख्य व्यवस्थापक राजू वंजारे, काळजीवाहक छाया सरोदे, यश वंजारे यांनी सांगितले. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून शासकीय मदत बंद असल्याने शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील गरजू लाभार्थ्यांच्या मदतीसाठी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे आवाहन राजू वंजारे यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा