सायं. दैनिक बीड रिपोर्टर चा ३३ वा वर्धापन दिवस धडाक्यात साजरा
सायं. दैनिक बीड रिपोर्टर चा ३३ वा वर्धापन दिवस धडाक्यात साजरा
तय्यब शेख, गणेश सावंत, मजीद शेख, मुबीन शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
एजाज शेख, जगन्नाथराव पवळ, रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांच्याकडून हृदयी शुभेच्छा .........
बीड।एस.एम.न्युज़
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक ३० मे २०२६ शनिवार रोजी सायं. दैनिक बीड रिपोर्टर चा ३३ वा वर्धापन दिवस धडाक्यात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संपादक तथा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तय्यब सिकंदर शेख, कार्यकारी संपादक गणेश सावंत, ज्येष्ठ उपसंपादक मजीद शेख, निवासी संपादक मुबीन शेख, उपसंपादक मिर्झा वसीम बेग यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला.
या कार्यक्रमास मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राला वाहिलेले सा. वृत्तपत्र द स्कूल एक्सप्रेस चे संपादक एजाज पाशा शेख, ज्येष्ठ उद्योजक फार्मासिस्ट तथा ॲडव्होकेट जगन्नाथराव पवळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनीही उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा देत यापुढेही दैनिक रिपोर्टरने वृत्तपत्र क्षेत्रात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सर्व शुभेच्छुकांचे रिपोर्टर परिवाराने मनस्वी आभार व्यक्त केले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा