Breaking News

काव्यवेडे समूहाचे प्रथम कविसंमेलन मुंबई येथे संपन्न बीडचे कवी अनंत सूतनासे यांच्या चोख नियोजनाची मुंबईत चुणूक

काव्यवेडे समूहाचे प्रथम कविसंमेलन मुंबई येथे संपन्नबीडचे कवी अनंत सूतनासे यांच्या चोख नियोजनाची मुंबईत चुणूक

मुंबई (एस.एम.न्युज़)
दर्जेदार लिखाणासाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या काव्यवेडे साहित्य समूह यांचे  प्रथम कविसंमेलन दिनांक ३०-३१ मे २०२६ रोजी अशोका फॉर्म हाऊस मुंबई (कळवे) येथे संपन्न झाले.
                     महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवी व कवयित्री यांनी विविध विषयावरील काव्य सादर करून रसिकांची मने जिंकली. दोन सत्रामध्ये झालेल्या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी अनिल गुरव, अनंत सुतनासे, वर्षा शेट्ये, योगेश खैरनार, वंदना राऊत, जितेंद्र मोरे, मनिषा पाटील, दिपक तळाशिलकर, भक्ती मुळ्ये, बाळा रेणोसे, साधना काळे, अतुल देसाई, स्मिता तोंडवळकर, यांनी आपला सहभाग नोंदवला.
                       कार्यक्रमाची सुरुवात अनिल गुरव, अनंत सुतनासे, सौ. वर्षा शेट्ये, सौ.स्मिता तोंडवळकर, सौ.स्मिता काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
                    काव्यवेडे समूहाचे प्रशासक अनिल गुरव, अनंत सुतनासे, वर्षा शेट्ये यांनी नवीन कवी व कवयित्री यांना व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असे मनोगतामध्ये व्यक्त केले.
                        दोन दिवस चाललेल्या कविसंमेलनाचे रंगतदार सूत्रसंचालन सौ. अश्विनी गुरव यांनी करून कवी संमेलनाला रंगत आणली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनंत सुतनासे यांनी केले.
                 कविसंमेलन यशस्वीतेसाठी काव्यवेडे समूहाचे प्रशासक अनिल गुरव, योगेश खैरनार, अनंत सुतनासे व वर्षा शेट्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*

संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत