Breaking News

ए.आय.च्या फेक पोस्टमुळे वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर संकट

ए.आय.च्या फेक पोस्टमुळे वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हलोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर संकट

बीड।एस.एम.न्युज़
अलीकडील काही दिवसात ए.आय. च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पोस्ट सोशल मीडियावर  पाहून डोकं गरगरू लागले आहे. यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या आधारस्तंभावरून वाचकांचा विश्वास डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वृत्तपत्र धुरीनांनी या विरोधात वेळीच पाऊले उचलणे आवश्यक आहे.
               अलीकडे ए.आय.च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पोस्ट सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यात पूर्वी रस्त्यावर सायकल चालविणाऱ्यांना टॅक्स भरावे लागायचे. पायी चालणाऱ्यांना सुद्धा टॅक्स भरावे लागायचे अशी पोस्ट व्हायरल झाली.
              महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या आणि ०१ किलो शुद्ध तूप खाल्ल्याची बातमी नामवंत दैनिक तरुण भारत मध्ये छापून आल्याची जुनी दिसणारी कटिंग सुद्धा व्हायरल झाली.
               आता नुकतीच लग्न झालेल्या पुरुषाने रखेली ठेवण्यासाठी अधिकृतरित्या काढलेला परवाना सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
                 सोशल मीडिया वरून अशा प्रकारे जुने दिसणाऱ्या संदेशांचे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशा संदेशांना काहीजण खरे समजून व्हायरल करीत आहेत तर काहीजण टिंगल-टवाळी करून मजा घेण्यासाठी व्हायरल करीत आहेत.
                 जुने दिसणारे जे परवाने सोशल मीडियावरून फिरविले जात आहेत, त्याची सत्य-असत्यता पडताळून पाहण्याचा मार्ग आहे की नाही हेही सोशल मीडियाचा उपयोग करणाऱ्यांना माहित नाही. असे परवाने व्हायरल झाले तरी समाज माध्यमात काही फरक पडणार नाही.
                तरुण भारत सारख्या नामवंत वृत्तपत्राच्या नावासहित विद्यमान मुख्यमंत्री एका वेळेस ३५ पुरणपोळ्या आणि ०१ किलो तूप खातात ही बातमी जेव्हा व्हायरल होते, तेव्हा लोकशाहीच्या या चौथ्या आधारस्तंभावर खरंच विश्वास करावा की नाही अशी अवस्था वाचकांची होते.
                 यापुढेही जर अशा प्रकारे कोणत्याही दैनिकाच्या नावासहित जुनी तारीख टाकून, ए.आय. तंत्रज्ञान वापरून, व्हायरल करण्यात आली आणि त्यात सत्यता नसेल अशावेळी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरील वाचकांचा विश्वास डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय प्रसिद्धी माध्यमावर गालबोट लागेल.
                   वृत्तपत्र धुरीनांनी अशा उचापत्या किंवा उपद्व्यापाकडे लक्ष देऊन वेळीच पाऊले उचलणे आवश्यक आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत