Breaking News

गाईला राष्ट्रीय पशू घोषित केल्यास दिवाळी साजरी करू - शेख फारुख

गोवंश हत्येवर मकोका लावण्याच्या निर्णयाचे स्वागत!!गाईला राष्ट्रीय पशू घोषित केल्यास दिवाळी साजरी करू - शेख फारुख

बीड (एस.एम.न्युज़) - राज्यात गोवंश संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून संघटित स्वरूपातील गुन्ह्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेख फारुख यांनी स्वागत केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कायद्याला अधिक बळ मिळणार असून सामाजिक शांतता आणि कायद्याचा धाक निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                शेख फारुख म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत गाईला आदराचे स्थान आहे. त्यामुळे गोवंश संरक्षणासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय हा जनभावनांचा सन्मान करणारा आहे. भविष्यात केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय पशू घोषित केल्यास आम्ही दिवाळी साजरी करू” असेही ते म्हणाले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत