धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गा वरील चौसाळा ते खांमगांव मधील प्रलंबित शेतकऱ्यांचा मोबदला वाटप करा - प्रवीण पालीमकर
धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गा वरील चौसाळा ते खांमगांव मधील प्रलंबित शेतकऱ्यांचा मोबदला वाटप करा - प्रवीण पालीमकर
बीड (एस.एम.न्युज़) - धुळे-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग 211 अंतर्गत येणाऱ्या चौसाळा ते खांमगांव राष्ट्रीय महामार्ग 211 चे भुसंपादन 2013 ते 2017 पर्यंत कार्यवाही सुरु होती. तत्कालिन उपजिल्हाधिकारी भुसंपादन जा.प्र. यांनी मुळ निवाडे प्रसिध्द करुन नॅशनल हायवे कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर केले होते. त्यानुसार मावेजा वाटप करण्यात आला. यानंतर सर्व शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे एक्ट 1956 व 2013 भुसंपादन कायदा यानुसार लवाद जिल्हाधिकारी बीड येथे वाढीव मोबदला मिळणेसाठी प्रकरणे दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सुनावण्या घेण्यात आल्या. परंतु काही प्रकरणांत नियम धाब्यावर बसवुन मागील तारखेत किंवा तत्परतेने निकाल देण्यात आले. परंतु संपादीत संघ नॅशनल हायवे कार्यालय यांनी त्या प्रकरणात मावेजा मंजुर करुन आपणांकडे पाठविला. परंतु हे प्रकरणे मागील तारखेत किंवा नियमबाह्य आहेत असे सर्व वर्तमानपत्रात छापुन आलेले आहे. मा. जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही भ्रष्ट कर्मचारी व तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी गैरकृत्य केलेले आहे. परंतु या प्रकरणात बाधीत शेतकरी यांचा
मोबदला नॅशलन हायवे कार्यालय यांनी आपणांकडे पाठवलेला आहे असे दिसुन येत आहे. यामुळे त्यांच्या पापाचे फळ प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये तसेच शेतकऱ्यांचा हक्क मारता येणार नाही. कारण नॅशनल आयवे एक्ट 1956 व भुसंपादन कायदा 2013 नुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मागण्याचा पुर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपणामार्फत प्रलंबीत असलेला शेतकऱ्यांचा सर्व मोबदला त्वरीत वाटप करण्यात यावा. अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समितीचे मराठवाडा अध्यक्ष प्रवीण पालीमकर यांनी निवेदना मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.
तरी मा. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालुन योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दुर करावा अशी विनंती बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून शेतकरी राजा सामाजिक समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री यांना देखील करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना तात्काळ योग्य तो न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समितीचे मराठवाडा अध्यक्ष प्रवीण पालीमकर यांनी केली आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा