सामाजिक न्याय भवनात स्वच्छतेचा बोजवारा! लाखो रुपयांचे बोअर, पाण्याची टाकी, स्वच्छता गृहाकडे अक्षम्य दुर्लक्ष
सामाजिक न्याय भवनात स्वच्छतेचा बोजवारा!
लाखो रुपयांचे बोअर, पाण्याची टाकी, स्वच्छता गृहाकडे अक्षम्य दुर्लक्ष
बीड (एस.एम.न्युज़) - सामाजिक न्याय भवनात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. लाखो रुपयांचे बोअर, पाण्याची टाकी आणि स्वच्छता ग्रहाकडे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अक्षम्य असे दुर्लक्ष दिसून आले आहे.
शहरातील शासकीय सामाजिक न्याय भवनात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला मात्र याच इमारतीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या इमारतीत असलेल्या विविध कार्यालयात कर्तव्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह येथे आलेल्या अभ्यागताना टॉयलेट, बाथरूम व मुतारीची सोय व्हावी म्हणून ते सुद्धा येथे बांधलेले आहे. एवढेच नाही तर त्यांचा वापर करताना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लाखो रुपये खर्च करून या कार्यालयाच्या आवारात बोअर ही घेतलेले आहे. हजारो लिटर पाणी सामावून घेणाऱ्या टाक्या सुद्धा इमारतीवर आणून ठेवलेल्या आहेत. त्यात बोअर मधून कनेक्शन घेतलेले आहे. यासाठी विद्युत कनेक्शन ही कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून ना बोअर चालू केले जाते, ना इमारतीवरील पाण्याच्या टाक्या भरल्या जातात म्हणून टॉयलेट, बाथरूम व मुतारी मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा थेंब नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनायासे या वास्तूंचा उपयोग करणाऱ्यांना पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण आणि अस्वच्छता झालेली आहे. स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे. येथील गलिच्छतेमुळे संपूर्ण इमारतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे. तरीही या इमारतीमध्ये असलेल्या विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे मात्र याच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकतेच २६ जानेवारी रोजी याच कार्यालयाच्या आवारात मोठ्या दिमाखात भारताचा तिरंगा झेंडा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. यामुळे सामाजिक न्याय भवनात प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा केला जातो. मात्र लाखो रुपयांचे बोअर व पाण्याची टाकी असूनही स्वच्छतेचा बोजवारा उडविला जातो असे दिसून आले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा