Breaking News

द स्कूल एक्सप्रेस, अविष्कार कोचिंग क्लासेस व युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

द स्कूल एक्सप्रेस, अविष्कार कोचिंग क्लासेस व युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा थाटात संपन्न


बीड (एस.एम.न्युज़) - शिक्षण क्षेत्रात गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या द स्कूल एक्सप्रेस या शैक्षणिक वृत्तपत्राच्या वतीने, अविष्कार कोचिंग क्लासेस व युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आयोजित या सोहळ्यात आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, विशेष शिक्षक, शिक्षण मित्र तसेच आरोग्य दूत पुरस्कार देऊन गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार कदम होते. तर भाजप चे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सय्यद अजहर अली, दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, गटशिक्षणाधिकारी समंदर खान, भाजप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख इर्शाद, नगरसेवक सय्यद मुस्तफा, नगरसेवक मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगताप, सज्जाद खान तसेच केंद्रप्रमुख हकीम मणियार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुशाहेद काझी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुज्तबा खान, संपादक शेख एजाज, प्रा. सुनील खंडागळे, इंजि. हर्षल केकान, शेख इमरान, धनवंत मस्के, विकास सरवदे, आबेद खान, शेख रिजवान, शेख रय्यान व शेख शायान यांनी विशेष परिश्रम घेतले.

===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत