Breaking News

सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दीकी यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान

सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दीकी यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान


सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दीकी यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील नामवंत मिल्लिया महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दीकी यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ऊक़ाब रिलीफ फाउंडेशन, बीड यांच्या वतीने सीरतुन्नबी प्रश्नोत्तरी स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वा. मिल्लिया महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुहम्मद अली बागे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सय्यद फैज़ उपस्थित होते.
या कार्यक्रमात शंभराहून अधिक विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. समारंभात नवीद सिद्दीकी (सेवानिवृत्त प्राचार्य, नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड) यांचा सन्मान सोहळा करण्यात आला. त्यांना सपत्नीक शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुहम्मद इलयास, एहसान सौदागर, फ़ैज़ान अली बागे, इंजि. सुफ़ियान, मोमीन आमेर, शेख ऐहतशाम, शेख शाजेन, मुहम्मद फारेस, अब्दुल सबुर, हारेस अन्सारी, मुश्ताक भाई यांच्यासह अन्य सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत