Breaking News

फिल्मस्टार डॉ. महेश कुमार यांना रायझिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमा पुरस्कार प्रदान

फिल्मस्टार डॉ. महेश कुमार यांना रायझिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमा पुरस्कार प्रदान


फिल्मस्टार डॉ. महेश कुमार यांना रायझिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमा पुरस्कार प्रदान

मुंबई (एस.एम.न्युज़) - हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटांचे मुख्य अभिनेते आणि बीडचे भूमिपुत्र फिल्मस्टार डॉ. महेश कुमार यांना 'रायझिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमा' हा "भारत राष्ट्र भूषण पुरस्कार" मुंबई येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात विविध भाषेतील समाज प्रबोधक चित्रपटांसाठी डॉ. महेश कुमार यांचे विशेष कौतुक करण्यात आले. 

सत्कार समारंभात बोलताना डॉ. महेश कुमार यांनी म्हटले की, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, मनोरंजनासोबतच जर एखादा विचार देता आला तर नव्या पिढीत नवा दृष्टिकोन वृद्धिंगत होईल. त्यादृष्टीने नवीन चित्रपट स्वीकारताना मी विचार करतो. बॉलिवूड मध्येही त्यांच्या या पुरोगामी विचारांचे स्वागत केले जात आहे.

बीडच्या या भूमिपुत्राने आतापर्यंत मराठी वामा आणि ठिणगी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या असून नुकताच त्यांची मुख्य भूमिका असलेला मातृ देवो भवः हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट रसिकांच्या तुफान गर्दीत हा चित्रपट सुरू आहे. या चित्रपटाची भावस्पर्शी कथा, गीत, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती उच्च दर्जाचे असल्याने हा चित्रपट रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करू लागला आहे.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत