Breaking News

ऐतिहासिक कारंजा टॉवर पाहायला येणारे मुलं व पालक हिरमुसले होऊ लागले

रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे बंद पडले

पूर्ववत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन - रमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या काही महिन्यांपासून ऐतिहासिक कारंजा टॉवर समोरील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे बंद पडले आहेत. ते पूर्ववत सुरू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेश गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी बीड नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराच्या मध्यभागी असलेली ऐतिहासिक कारंजा टॉवरची इमारत ही बीड शहराची ओळख आहे. मात्र बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या इमारतीला अवकळा आली आहे. या इमारतीकडे बीड नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, याकरिता आतापर्यंत अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत परंतु शासकीय-प्रशासकीय यंत्रणे कडून अद्यापही याची दखल घेतली गेलेली नाही.

सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे बीड शहरासह परगावाहून आजोळी आलेली मुलं-मुली ऐतिहासिक कारंजा टॉवर व त्यासमोरील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे फवारे पाहून आनंद घेण्याकरिता पालकांसोबत मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. 

येथील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे फवारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा अब्दुल रऊफ़ बेग यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेत स्वतःच्या पदरमोडसह लोकवर्गणी करून सुरू केले होते व गेली अनेक महिने जातीने लक्ष देऊन ते चालविले परंतु आता त्यांच्या मागील कामाच्या व्यापामुळे त्यांना याकडे लक्ष देता येईना. म्हणून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून येथील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे बंद पडले आहेत. 

बीड शहरातील नागरी समस्यांसह ऐतिहासिक ठेवा असलेल्या वास्तूंची निगा राखणे, त्यांचे जतन करणे बीड नगर परिषद चे नैतिक कर्तव्य असून सुद्धा बीड नगर परिषद कडून याकडे लक्ष दिले जात नाहीये. 

यामुळे येथील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. ते पूर्ववत सुरू व्हावे आणि या ऐतिहासिक वास्तुसह येथील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे पाहण्याकरिता आपल्या पालकांसह येणारी मुले-मुली हिरमुसली होऊ नये, येथील नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद त्यांना मिळावा. याकरिता या ऐतिहासिक कारंजा टॉवर समोरील रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे पूर्ववत सुरू करण्याकरिता आवश्यक कार्य करावे.

अन्यथा ऐतिहासिक कारंजा टॉवर साठी बीड नगरपालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत