समाजसेवक जावेद कुरेशी यांच्या पुढाकाराने मुस्लिम खाटीक समाजाकडून पत्रकार बांधवांचा सन्मान
दिवाळी सणानिमित्ताने दिवाळी भेट देऊन वृद्धिगंत केले ‘स्नेहबंध’
आदर्श उपक्रमाला हाजी अराफात यांची प्रमुख उपस्थिती
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील शासकीय विश्रामगृहात समाजसेवक जावेद कुरेशी यांच्या पुढाकाराने मुस्लिम खाटीक समाजाकडून पत्रकार बांधवांचा दिवाळी सणानिमित्ताने दिवाळी भेट देऊन सन्मान करण्यात आला. या आदर्श उपक्रमाला हाजी अराफात यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते पत्रकार बांधवांना दिवाळी भेट देऊन ‘स्नेहबंध’ वृद्धिगंत करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे राज्य मुस्लिम खाटीक समाजाने बीड येथील पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात जावेद कुरेशी यांच्यासह हाजी अराफात यांनी पत्रकार बांधवांविषयी बोलताना अत्यंत सकारात्मक बाबींचा उल्लेख केला. या दोन्ही प्रवक्त्यांच्या भाषणांमुळे पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत होते. दिवाळी सणा निमित्ताने पत्रकारांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेत एका समाजाकडून करण्यात आलेल्या या उपक्रमाची चर्चा पाहता पाहता बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात झाली. कार्यक्रमात पत्रकारांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू (गिफ्ट) देऊन सन्मानित करण्यात आले. खाटीक समाजाच्या या उपक्रमामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा