Breaking News

शेख शफीक अहेमद यांचे अल्पशा आजाराने निधन

नमाज़ ए ईशा नंतर बालेपीर दर्गा कब्रस्तानात तद्फ़ीन

बीड (एस.एम.न्युज़) - स्टार ऑटो इलेक्ट्रिशियन गॅरेजचे मालक तथा संचालक शेख शफीक अहेमद यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सुप्रसिद्ध स्टार इलेक्ट्रिशियन गॅरेजचे मालक तथा संचालक असलेले शेख शफीक अहेमद हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ५८ वर्षांचे होते. ते जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी शेख अहेमद बाबन यांचे द्वितीय पुत्र होते तर स्टार ऑटो बॅटरीज चे मालक संचालक शेख अब्दुस् समद अहेमद आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शेख शकील अहेमद यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी त्यांच्या पार्थिवाचे तद्फ़ीन बालेपीर दर्गा येथील कब्रस्तानात नमाज़ ए ईशा नंतर करण्यात आले. अल्लाह शेख कुटुंबीयांना या दुःखाला सहन करण्याची शक्ती देवो. शेख कुटुंबीयांच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत