संपादक *अशोकराव होळकर* यांनी आपल्या *बीड प्रहार* या वृत्तपत्रात अत्यंत पोटतिडकीने तरुणांसाठी केलेले लिखाण जसेच्या तसे खास *एस.एम.न्युज़* च्या वाचकांसाठी
तरुणांनो, पुढाऱ्यांचे खेटरं उचलून, उदोउदो करुन आयुष्याचं वाटोळं करुन घेऊ नका
चोवीस तास ऑनलाईन राहून नेत्यांच्या पोस्ट टाकून तुमच्या पोटाचा प्रश्न सुटणार आहे का ?
तरुणाई आज जास्त सोशल मीडिया वर २४ तास सक्रिय राहून स्वतःचे नेट पॅक टाकून अमका आमचा नेता तमका आमचा नेता, यातच धन्यता मानताना दिसून येत आहे. पुढाऱ्यांच्या मागे उदोउदो करत फिरून आणि त्यांचे खेटरं उचलून आयुष्यातील खरे कमविण्याचे दिवस आजची तरुणाई बरबाद करू लागली आहे. कुटुंबातील लोकांचे कष्ट विसरून, आपण मात्र टवाळक्या मारत फिरत बसतो. पुढाऱ्यांच्या पाठीमागे जय करत फिरतो. घरात एखादी वस्तू कमी पडली तर तुम्हाला तुमचा पुढारी देतो का, शेवटी कष्ट करूनच ती वस्तू खरेदी करावी लागते. याचेच भान आपण विसरतो. हेच वय असतं याच वयात आपण काहितरी कमवू शकतो. चार पैसे घरी आणून आई वडिलांना हातभार लावू शकतो. परंतु कष्ट करण्याची क्षमता कमी झाल्याने आणि सोशल मीडियावर जास्त ओळखी झाल्याने कामाची लाज वाटू लागली. हीच आमची शोकांतिका आहे. आभासी दुनियेत जगण्यात धन्यता मानून पोट भरत नसतं. याचं भान तरुणांनी ठेवलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची कामे करा आणि आई वडिलांना सांभाळा. त्यांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी आपल्या साठी केलेला संघर्ष आठवून त्यांना वृद्ध पणात आरामात ठेवण्यासाठी आजच चार पैसे कमावण्याची सवय लावने ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि नौकरीची जर शक्यता नसेल तर त्यांनी इतर कामात व्यर्थ वेळ न घालता छोट्या मोठ्या उद्योगाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
तरुणांनी प्रथम शिक्षणाला महत्व देऊन शिक्षण पूर्ण करून नौकरीसाठी पेट दो वोट दो प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुणवत्ता असेल तर नौकरी मिळू शकते. नौकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता शिक्षणाचा फायदा एखाद्या चांगल्या उद्योग व्यवसायासाठी होऊ शकतो. उद्योगात देखील मोठे नाव लौकिक मिळू शकते. उद्योगासाठी भांडवल नसेल तर कोणाच्या दुकानावर अथवा कंपनीत अथवा इतर कुठल्याही ठिकाणी काम करून अनुभव आणि पैसे मिळवू शकता. आणि त्यातून छोटा मोठा उद्योग का होईना उभारू शकता. आणि आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावू शकता. परंतु ही तळमळ युवकांमध्ये दिसून येते का? हाच खरा प्रश्न आहे. शिक्षण संपले नौकरी लागत नाही शेतात काम करू शकत नाही. मग कोण्यातरी पक्षाचा झेंडा उचलून युवा नेत्याच्या पाठीमागे आई वडिलांच्या कमाईवर कडक पांढरेशुभ्र कपडे घालून जय जय करत फिरायचे आणि पुन्हा चारसहा महिन्यात कोण्यातरी पदाची निवड होते. आणि पेपरात निवडीचे फोटो छापून आले की झाले गल्लीतील किंवा शहरातले युवा नेते आणि येथूनच सुरू होते. आयुष्याचं वाटोळं व्हायला २४ तास ऑनलाईन राहून आमचं दैवत आमचं काळीज खंबीरसाथ, आमचं हृदयस्थान, म्हणून आईबापांच्या जी वावर बसून खायचं आणि नेटप्याक सुद्धा त्यांच्याकडूनच घ्यायचं आणि गुणगान मात्र राजकरण्याचं गायचं असली दळभद्री औलाद ज्या आईबापांच्या पोटाला असेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून खुशाल कामधंदा सोडून आणि फुकटचं पेट्रोल जाळून नेत्यांच्या मागे उदोउदो करत फिरताना २०ते ३० च्या आतील तरुणाई दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली असून तरुणांच्या हाताला कामे नाहीत. म्हणून एकीकडे आपण ओरडतो रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत म्हणून आपण मागण्या करतो. परंतु त्या रोजगाराच्या संधी आज तरी कोण्या पुढाऱ्यांच्याकडून पूर्ण होतील ही अपेक्षाच मुळात चुकीची वाटू ला गली आहे. या तरुणांच्या हाताला काम देऊन यांचे झेंडे कोण उचल-तील ? यांच्या मागे कोण फिरणार राजकारणात घराणेशाही आहे तिथे तुमच्या आमच्या सारख्याला कोणी विचारत नाही, आणि कार्यकर्ता मोठा करू कोणालाच वाटत नाही त्यासाठी तरुणांनी आयुष्यातील अनमोल दिवस वाया न घालवता छोटा मोठा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा आणि काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांना आर्थिक हातभार लावून कुटूंब सुधाराव आणि नंतर राजकारणाची आवड असेल तर निवड करावी राजकारण करावं परंतु कमविण्याचे वय एकदा निघून गेले तर आयुष्याची बरबादी होते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
*परखड - अशोक होळकर*
संपर्क - *9130117000*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा