Breaking News

संपादक *अशोकराव होळकर* यांनी आपल्या *बीड प्रहार* या वृत्तपत्रात दुसऱ्यांदा अत्यंत पोटतिडकीने तरुणांसाठी केलेले लिखाण जसेच्या तसे खास *एस.एम.न्युज़* च्या वाचकांसाठी

कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणाऱ्या पुढाऱ्यांची मुलं आंदोलनात कधी असतात का?

तरुणांनी राजकारण्यांच्या वावटळीत सापडू नये; हमाली करा पण यांच्या दारात उभा राहू नका.

राजकारणाकडे सध्या मोठ्याप्रमाणात तरुणाई आकर्षित होतांना दिसून येत असून नेत्यांच्या मागेपुढे लुडबुड करणारे अनेक तरुण या नेत्यांकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने जवळ जाताना दिसतो आहे. एखादे काम घेऊन गेला तर दिवस दिवस नेत्यांची वाट पहात त्यांच्या बंगल्यासमोर ताटकळत उभे राहून दाताचे पाणी गिळत असतील तर कार्यकर्त्यांनी असल्या भानगडीत न पडलेले बरे नाही का?
एखादे आंदोलन असेल तर त्या आंदोलनात किती नेत्यांच्या मुलावर लाठ्या काठ्या पडल्या? किती मुलावर गुन्हे दाखल झाले? याचाही अभ्यास करून निर्णय घेतला पाहिजे. नेत्यांची मुले विदेशात आणि मिसरूड न फुटलेला कार्यकर्ता जेलात? राजकारणाचे खूळ डोक्यात घुसलेल्या तरुणांनी जागे व्हावे आणि यांच्या वावटळीत सापडू नये अन्यथा पूर्ण आयुष्य बरबाद होण्यास वेळ लागणार नाही. राजकारण करूच नका असे माझे अजिबात म्हणणे नाही. राजकारण केले पाहिजे परंतु त्यासाठी अगोदर स्वतः च्या पायावर उभा राहून पुरेसा पैसे कमावण्याची अक्कल पण आली पाहिजे. स्वतःचे कुटूंब तरी व्यवस्थित चालावं चांगले उद्योग व्यवसाय उभरावेत मग राजकारण केले तर हरकत नाही परंतु आजकाल तरुणाई पांढरे शुभ्र स्टार्च चे कपडे अंगावर घालून गाडीवर फिरून दिवसाकाठी ४०० ते ५०० रु खर्च कमीतकमी केल्याशिवाय घरी जात नसतील. हे खात्रीलायक आई-वडिलांच्या जीवावर बसून खाणाऱ्या तरुणांनी २४ तास ऑनलाइन राहून फेसबुकवर इंस्टावर व्हाट्सएपच्या स्टेटसला आमचे दैवत, आमचा आधार म्हणून ठेवले जाते. बापाकडून बॅलेन्सला पैसे घ्यायचे आणि नेत्यांचे उदोउदो करण्यात ही तरुणाई धन्यता मानणार असेल तर नक्कीच दुर्देवी बाब म्हणावी लागेल. आंदोलन मोर्चा काढला जातो त्यात फक्त सामान्य कुटुंबातील पोरं बेंबीच्या देटापासून ओरडण्यासाठी आणि झेंडे घेऊन मिरवण्यासाठी सर्वात पुढे असतात हे कोणी नाकारू शकत नाही. आंदोलनात राडा झाला तर केसेस या मुलांवर, कोर्टात, ठाण्यात चकरा मारण्याचे काम सामान्य कार्यकर्त्यांनी करायचे आणि मोठेपणा नेत्यांनी मिरवायचा हे सर्वश्रुत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने तरुणाई पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. दोन नंबरचे धंदे करतात. यामुळे कोणी चांगला पैसा कमावतो तर कोणी देशोधडीला लागतो. ज्या वयात चार पैसे कमावण्याचे दिवस असतात त्या दिवसात राजकारण डोक्यात शिरते आणि वाटोळे होते. याचे भान तरुणांनी ठेवले पाहिजे. नेत्यांच्या वावटळीत सापडले नाही पाहिजे अन्यथा वाटोळे होण्यापासून कोणी ही रोखणार नाही. याचा खोलवर विचार केला पाहिजे.

*किती नेत्यांचे मुलं आंदोलनात जेलमध्ये गेली ?*
पक्षाचे आंदोलन असो की आपल्या आवडत्या नेत्यांनी ठेवलेले आंदोलन असो. या आंदोलनात सहभागी हा सामान्य घरातील तरुण असतो. ज्यांचे वय शाळा-महाविद्यालयात जायचे आहे ते तरुण आंदोलनात सहभागी होतात आणि जे नेते म्हणून मिरवतात त्यांची मुले मोठमोठ्या देशविदेशातील शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेतात. याचा कधी आपण विचार करतो का? विचार केला तर आजपर्यंत किती पुढाऱ्यांच्या मुलांनी आंदोलनात काठ्या लाठ्या खाल्ल्या आणि केसेस होऊन जेलमध्ये गेले? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावं, उद्योगासाठी पैसा नसेल तर हमाली करावी पण या नेत्यांची हुजरेगिरी करून आयुष्याचे वाटोळे करून घेऊ नये.
*परखड - अशोक होळकर*
संपर्क - *9130117000*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत