एमपीएससीतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती
एमपीएससीतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती
नौशाद अत्तार ने जिद्द व चिकाटीच्या बळावर मिळविली नोकरी
*बीड (एस.एम.न्युज़) -* नौशाद जब्बार अत्तार या गुणी विद्यार्थ्याने जिद्द, मेहनत व चिकाटीने एमपीएससी ची परीक्षा देऊन त्यात गुणवत्तेच्या बळावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बीड येथे लिपिक पदावर नियुक्ती मिळविली. या यशाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शालसह पेढे भरवून हृदयी सत्कार केला.
या छोटे खानी सत्कार कार्यक्रमात त्यांचे भाऊ वृत्तपत्र क्षेत्रातील संगणक तज्ञ इर्शाद अत्तार, शेख लईख़, जलील शेख, कांडेकर, बाळू, किशोर जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नौशाद अत्तार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत एमपीएससीची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण होऊन त्यांनी स्वबळावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लिपिक पदावर नियुक्ती मिळविली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा