बीडचे भूमिपुत्र डॉ. महेश कुमार यांचा सरीवर सरी लवकरच चित्रपटगृहात
बीडचे भूमिपुत्र डॉ. महेश कुमार यांचा सरीवर सरी लवकरच चित्रपटगृहात
बीडचे भूमिपुत्र डॉ. महेश कुमार यांचा सरीवर सरी लवकरच चित्रपटगृहात
*बीड (एस.एम.न्युज़) -* बीडचे भूमिपुत्र डॉक्टर महेश कुमार आता वामा चित्रपटाच्या अफाट यशानंतर नृत्य सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या सोबत "सरीवर सरी" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असून लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात झळकणार आहे.
महिन्यांपूर्वी एकाच वेळी ३०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला "वामा" चित्रपट अजूनही अनेक ठिकाणी चालू आहे. बीडमध्ये सलग दोन आठवडे हाऊसफुल चा बोर्ड लावणारा, तसेच जालना येथील चित्रपटगृहात दीडशे दिवसापेक्षा जास्त चालणारा वामा चित्रपटानंतर मराठवाड्याचा रांगडा हिरो डॉ. महेश कुमार आणि प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी महाराष्ट्राची नृत्य सम्राज्ञी गौतमी पाटील सह आता "सरीवर सरी" या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे.
सुप्रसिद्ध निर्माते अनंत जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची गाणी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सामंत आणि कु. अनन्या सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. पारिजात चव्हाण यांनी ही सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. पत्रकारांशी बोलताना डॉ. महेश कुमार यांनी म्हटले की, सरीवर सरी हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कारण कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, सस्पेन्स, थ्रिलर असा एक अनोखा प्रयोग आम्ही या चित्रपटाद्वारे केला आहे. तरी सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन सरीवर सरी हा चित्रपट पहावा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवावा असे आवाहन देखील बीडच्या या भूमिपुत्राने प्रेक्षकांना केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा