Breaking News

अत्तार वेल्फेअर ट्रस्ट कडून नौशाद अत्तार यांचा सत्कार

अत्तार वेल्फेअर ट्रस्ट कडून नौशाद अत्तार यांचा सत्कार

एमपीएससीतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती

*बीड (एस.एम.न्युज़) -* नौशाद जब्बार अत्तार यांनी मेहनत, चिकाटी व गुणवत्तेच्या जोरावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बीड येथे एमपीएससी मधून लिपिक पदावर नियुक्ती मिळविली. या यशाबद्दल अत्तार वेल्फेअर ट्रस्ट च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पुष्पगुच्छ, पेन व शाल देऊन हृदयी सत्कार केला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या छोटे खानी सत्कार कार्यक्रमात अत्तार वेलफेयर ट्रस्टचे सचिव अकबर अत्तार, एजाज अत्तार, परवेज अत्तार, मौलाना तारिक अनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, नौशाद जब्बार अत्तार सारखे प्रतिभावान युवक समाजाची खरी संपत्ती आहे. त्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. नौशाद जब्बार अत्तार यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर अभिमान व्यक्त केला. आणि त्यांच्या पुढील यशासाठी अल्लाह कडे दुआ केली.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत