Breaking News

आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

सिनेटच्या सदस्य पदी निवडीनंतर विद्यापीठाच्या बैठकीला उपस्थिती

बीड (एस.एम.न्युज़) - विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे.
आ.संदीप क्षीरसागर यांची निवड ही विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी  विधानसभेचा प्रतिनिधी कोट्यातून केली आहे. आ.संदीप क्षीरसागर हे विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्याच्या मदतीसाठी सतत अग्रेसर असतात. तसेच त्यांनी विविध प्रश्न शासनदरबारी मांडून मार्गी लावले आहेत. या निवडी नंतर विद्यापीठाच्या उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या हस्ते आ.संदीप क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडी बद्दल त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

*विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड माझ्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब - संदीप क्षीरसागर*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी महाराष्ट्र विधानसेचे प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मी शासनाचे आभार मानतो.तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात माझी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब असून  या पदाला न्याय देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रगती व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत