Breaking News

बीडमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्थांना न्याय द्या अन्यथा १४ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण - ॲड.ए.एन.सय्यद

बीडमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्थांना न्याय द्या अन्यथा १४ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण - ॲड.ए.एन.सय्यद

बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र क्र. सीएटी-2023/प्र.क्र.144 इमा-2 नुसार मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामांचे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या या आदेशानुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
        या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाने काढलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात येईल,असा इशारा आंबेडकरी विचार मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.ए.एन.सय्यद यांच्या वतीने देण्यात आला आहे.
         निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक बेरोजगार अभियंते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या आदेशाकडे आशेने पाहत आहेत. मात्र, संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून कामांचे वाटप न केल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
         बीड जिल्ह्यातील अनेक तरुण अभियंते उच्चशिक्षित असूनही रोजगाराअभावी घरगुती अडचणींना सामोरे जात आहेत. शासनाने काढलेल्या आदेशामुळे या तरुणांना रोजगाराचे दार खुले होईल अशी अपेक्षा होती. मात्र, विभागीय पातळीवर आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने त्यांना मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे.बीड जिल्ह्यातील 416 मजूर संस्था व हजारो सुशिक्षित बेरोजगार अभियंते विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे.
         यामुळे जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन शासनाचे आदेश बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग सह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने लागू करावेत, अन्यथा येत्या 14 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे आंबेडकरी विचार मोर्चा व आंबेडकर रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष ॲड,ए.एन सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत