Breaking News

मनसेच्या मागणीने भ्रष्टाचार करणाऱ्या अनाधिकृत समित्यांची पाचावर धारण

बीड जिल्ह्यातील बोगस भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांवर कार्यवाही करा

मनसेच्या मागणीने भ्रष्टाचार करणाऱ्या अनाधिकृत समित्यांची पाचावर धारण

धर्मादाय उपायुक्तांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील बोगस भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांवर कार्यवाही करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धर्मादाय उपायुक्तांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केल्याने भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखालीच भ्रष्टाचार करणाऱ्या अनाधिकृत समित्यांची पाचावर धारण झाली आहे. या निवेदनानंतर धर्मादाय उपायुक्तांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात? आणि काय कारवाई करतात? याकडे समस्त बीड जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करून "भ्रष्टाचार निर्मूलन" या नावाने बोगस समित्या सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कार्यवाहीची मागणी केली आहे. याबाबत मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे व शहर अध्यक्ष अमर जान पठाण यांनी धर्मादाय उपायुक्त, बीड विभाग कार्यालयास सह जिल्हाधिकारी कार्यालयात व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने १९८५, २०१५ तसेच ३ जुलै २०१८ रोजी परिपत्रक काढून कोणत्याही धर्मादाय संस्थेला "भ्रष्टाचार निर्मूलन" व "मानवाधिकार" असे शब्द वापरण्यास मनाई केली आहे. तत्कालीन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिंगे यांनी यासंदर्भात कडक आदेश जारी केले होते. व त्याचप्रमाणे मागील वर्षी 'भ्रष्टाचार निर्मूलन' किंवा 'भ्रष्टाचार विरोधी' असे शब्द वापरणाऱ्या ११ संस्था आणि ट्रस्टवर पुणे धर्मादाय आयुक्तांनी कडक कारवाई केली आणि त्यांच्या विश्वस्तांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश ही दिले आहेत. तरीदेखील बीड जिल्ह्यात "भ्रष्टाचार निर्मूलन समिती व सामाजिक संस्था धारूर" या नावाने संस्था नोंदणीसाठी प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांची नोंदणी प्रक्रिया तात्काळ रद्द करून जिल्ह्यातील अशा नावाच्या सर्व बोगस संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव काकडे, तालुका उपाध्यक्ष स्वराज मस्के, बीड शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर, सुरज जोगदंड व कार्यालय अध्यक्ष शैलेश जाधवसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत