Breaking News

बीड जिल्ह्यात डॉक्टरांकडून गोरगरिबांची लूट!

बीड जिल्ह्यात डॉक्टरांकडून गोरगरिबांची लूट!


प्रशासनाने कारवाई करावी; शेख एहतेशामुद्दीन यांची मागणी

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा आरोप काँग्रेस (आय) पक्षाचे शहर उपाध्यक्ष शेख एहतेशामुद्दीन यांनी केला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली गरिबांकडून अवास्तव दराने फी आकारली जात असून, किरकोळ आजारांसाठीही हजारोंच्या बिलांची वसुली होत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

शेख एहतेशामुद्दीन यांनी म्हटले की, "जिल्ह्यातील अनेक डॉक्टर स्वतःच्या मेडिकल स्टोअर्सद्वारे औषधांना बाजारभावापेक्षा जास्त दर लावून रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, "ओपीडी फी, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, आयसीयू सुविधा तसेच शस्त्रक्रियांसाठी ठराविक आणि पारदर्शक दर लागू करणं गरजेचं आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता, सामान्य माणसाला खाजगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा राहिलेला नाही."
शेख एहतेशामुद्दीन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. तनाजी सावंत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे की, अशा प्रकारे रुग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. गरज भासल्यास संबंधित डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची शिफारस देखील त्यांनी केली आहे.
"डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप मानले जाते, पण आजच्या व्यापारीकरणाच्या युगात काही डॉक्टरांनी हा दर्जा गमावला आहे," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक जनतेकडूनही होऊ लागली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत