मोफत चे धान्य घेण्यासाठी गरीब आणि समाजात वावरताना श्रीमंत? अशांची आता खैर नाही!
चार चाकी वाहन असलेल्यांना शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळणार नाही
पुरवठा विभागाने चार चाकी वाहनधारकांची माहिती मागितली
बीड (एस.एम.न्युज़) - रेशन दुकानांवरून मोफत चे धान्य घेण्यासाठी गरीब होणारे मात्र समाजात वावरताना छान छोकीसाठी चार चाकी वाहने वापरणारे श्रीमंत असलेल्या अशा तऱ्हेवाईक गरीब-श्रीमंतांची आता खैर नाही. अशा चार चाकी वाहन असलेल्यांना यापुढे शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळणार नाही. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून चार चाकी वाहनधारकांची माहिती मागितली आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्यांसाठी अन्नधान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ हे मोफत दिले जातात मात्र या मोफत अन्नधान्याचा लाभ दुर्बल घटकांसह आर्थिक दृष्ट्या सबल असलेली अनेक कुटुंबेही उचलत असल्याची तक्रार अनेकदा होत होती. या विषयावर उशिराने का होईना बीड तहसील कार्यालयाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र काढून चार चाकी वाहनधारकांची यादी मागितली आहे.
याविषयी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे की म.वि.स. नियम १०५ अन्वये उपस्थित केलेली लक्षवेधी सुचना क्रमांक १४८१ च्या अनुषंगाने मा. मंत्री (अनुपुवगग्रास) महोदय यांनी केलेले निवेदन व त्यास अनुसरुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ योजनेंतर्गत उपलब्ध इष्टांकाचा पुर्णपणे वापर करुन लाभार्थ्यांना १०० टक्के धान्य वितरीत करण्याबाबत. बीड तालुक्यातील सर्व चार चाकी वाहन असलेली कुटुंबियांची शिधापत्रिका रद्द करणे करिता यादी पुरविण्यात यावी असे म्हटले आहे.
यासाठी मा. अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक १५२५/प्र.क्र. १०५/नापु-२८ दि. १० जुलै २०२५ चा संदर्भ अधोरेखित केला आहे.
त्यानुसार बीड तालुक्यातील आज रोजी जे शिधापत्रिका धारक हे अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अन्वये अन्न-धान्याचा लाभ घेत आहेत. त्यापैकी बीड तालुक्यातील ज्या शिधापत्रिका धारकांकडे चार चाकी वाहन आहेत त्या कुटुंबाची शिधापत्रिका रद्द करुन इतर पात्र योजनेमध्ये वर्ग करणे आवश्यक आहे. त्यानुसार बीड तालुक्यातील सर्व चारचाकी वाहन धारकांच्या माहितीची तहसील कार्यालयास आवश्यकता आहे. करिता बीड तालुक्यातील चारचाकी वाहन असलेल्या व्यक्तींची यादी तहसील कार्यालयास पुरविण्यात यावी. असे पत्र निरीक्षण अधिकारी पुरवठा तहसील कार्यालय, बीड यांनी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पाठविले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा