Breaking News

शालेय सेपक टकारा स्पर्धेत मिल्लिया बॉईज शाळेचे घवघवीत यश

शालेय सेपक टकारा स्पर्धेत मिल्लिया बॉईज शाळेचे घवघवीत यश

क्रीडा शिक्षक अन्वर मसरूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघांची दैदिप्यमान कामगिरी

*बीड (एस.एम.न्युज़) -* शहरातील नामांकित मिल्लिया बॉईज बीड चे (१४ व १९ वर्षाखालील)मुलांचे दोन्ही संघ अजिंक्य
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या द्वारे संचालित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत २२ ते २३ सप्टेंबर, २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बीड येथे झालेल्या जिल्हा स्तरीय सेपक टकारा स्पर्धेत मिल्लिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (मुलांची) बीड च्या १४ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलांच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.
बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर, सेपक टकारा संघटनेचे श्री.डॉ. परवेज खान,तालुका क्रीडा अधिकारी श्री. कालिदास आसुरकर, श्री. रेवणनाथ शेलार,श्री.जितेंद्र आराक, मिल्लिया संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ.सलीम बिन महेफूज, सचिव श्रीमती खान सबिहा बाजी, सह सचिव डॉ. शेख समीर ,मिल्लियाचे प्राचार्य श्री. चाऊस फैसल उप प्राचार्य श्री. सिद्दीकी अल्हाज, पर्यवेक्षक श्री. सय्यद मोईनोद्दीन यांनी क्रीडा प्रमुख श्री. शेख मसरुर अन्वर यांचे आणि दोन्ही विजयी संघांचे अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत