जमिनीचा मालक एक तर हद्दीचा मालक दुसरा
जमिनीचा मालक एक तर हद्दीचा मालक दुसरा
लोकहो, मूलभूत सोयीसुविधा विसरा?
नाही,नाही शासन-प्रशासनाला गदागदा हलवा, त्याशिवाय जमणार नाय!
बीड (एस.एम.न्युज़) - शहराच्या काही भागातील रस्ते हे बीड नगर परिषदेच्या आखत्यारीत तर काही सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यूडी अथवा बी.अँड सी. च्या आखत्यारीत आहेत. त्यापैकीच बशीरगंज चौक ते थोरातवाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय हा रस्ता सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकी हक्कात तर बीड नगर परिषद च्या हद्दीत आहे. म्हणून हा रस्ता जवळपास ३० वर्षांपासून खितपत पडला होता. हा रस्ता व्हावा, याकरिता या दोन्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये थोडेथोडके नव्हे तर ७ वर्षे सातत्याने पाठपुरावा करत १४ निवेदने देऊनही जेव्हा हा रस्ता होत नव्हता तेव्हा लोकशाहीतील सर्वात मजबूत हत्यार म्हणजेच आंदोलने केली.
यात सर्वप्रथम *व्यंगात्मक निषेध आंदोलन* नंतर *भीक मांगो आंदोलन* आणि तिसऱ्यांदा *बेशरम आंघोळ आंदोलन* (माझे तरुण तडफदार सहकारी सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांच्या सोबत मिळून) केली. एका वर्षात केलेल्या या तीन आंदोलनामुळे हे रस्ते एकदाचे चांगले झाले.
आता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस या रस्त्यासाठी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते, पक्षीय पदाधिकाऱ्यांना सुद्धा असाच अनुभव येत आहे. या रस्त्यासाठी बीड नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग अशा सर्व कार्यालयांनी व तेथील अधिकाऱ्यांनी हात झटकल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हे चित्र पाहता जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यासाठी जेव्हा सर्वप्रथम व्यंगात्मक निषेध आंदोलन केले होते तेव्हा बीड नगर परिषद आणि बी.अँड सी. या दोन्ही कार्यालयांच्या अनुभवावर एक *व्यंगात्मक कविता* सादर करून आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली होती.
आज तीच कविता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस दरम्यानच्या रस्त्यासाठी पुन्हा एकदा वाचकांच्या सेवेत सादर करीत आहे -
*ऐका हो ऐका आता माझी कथा*
*मला आहेत दोन बायका*
*एकीचं नाव आहे बीड नगरपालिका तर दुसरी आहे बी.अँड सी. बया*
*असूनही या दोघांचा दादला, एकही करीत नाही माझ्यावर माया*
*आता तुम्हीच सांगा कोण देणार मला प्रेमाची छाया!*
-आपलाच-
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस चा रस्ता
*लेखन - एस.एम.युसूफ़*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा