Breaking News

पप्पू टू पीएम! लेखन - शिवराम पाटील

पप्पू टू पीएम!

लेखन - शिवराम पाटील

राहुल गांधी आधी राजकारण गांभिर्याने करीत नव्हते.कोणी म्हणत कि, त्यांच्या समोरच आजी आणि वडिलांचा खून झाला.तर भय वाटणारच.कोणी म्हणत कि,आई  सोनिया गांधी आहेत तर ते लुडबुड करीत नाहीत.कोणी म्हणत कि,त्यांचा अनुभव कमी आहे.
    पण आता राहुल गांधी पप्पू राहिलेले नाहीत.त्यांनी भारत जोडो पद यात्रा काढली.रस्त्यावर अनेक प्रकारचे लोक भेटले.कोणी फोटो काढणारे.कोणी तक्रार करणारे.कोणी फक्त चर्चा करणारे.पण या लोकांनी राहुल गांधी यांना अनुभव समृद्ध केले .ज्ञान समृद्ध केले.
    राहुल गांधी यांना कांग्रेस मधील ७/१२ वरील वयस्कर नेते वेढून घेत असत.नवीन कोणी माणसाला किंवा तरूणांना ते भेटणे शक्य होत नसे.कोणी गेले तर मधील बडवे ज्यांना भडवे म्हणता ते भेटू देत नव्हते.आजही हे बडवे राहुल गांधींना भेटू देत नाहीत.ज्याचा मोठा वशीला आहे त्याच्या मार्फत भेटावे लागते.कांग्रेस मधे नेता आणि नागरिक यात मोठी भींत आहे.ती भींत चढून नेत्यांना भेटणे शक्य होत नाही.माझा अनुभव आहे.आम्ही   महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथे भेटायला गेलो तेंव्हा जळगाव च्या कांग्रेस नेत्यांनी त्यांना फोन करून सांगितले कि, यांना भेटू नका.हे आपल्या पक्षातील भ्रष्टाचार विरोधात बोलतात.तेंव्हा आम्ही चारशे किमी संगमनेर गेलो. तर  गावात शिरताच थोरात साहेब कार्यालय सोडून कुठेतरी निघून गेले होते.यात आमची चूक होती कि, जळगाव चे कांग्रेस नेत्यांना तशी बातमी दिली गेली होती.
      राजकारण, समाजकारण,धर्मकारण  यात माणसे भेटतात.जुडतात.जर भेटलीच नाहीत तर जुडतील कसे?हेच कारण होते.ज्यांना राहुल गांधी भेटत नव्हते.ते रागात येऊन कांग्रेस सोडून गेले.
    आता परिस्थिती बदलली आहे.आता राहुल गांधी रस्त्यावर भेटतात.नागरिकांशी संवाद करतात.आपले करून घेतात.भेटले ते कांग्रेसशी जुडतात.
    आता मत चोरी ची फाईल कांग्रेस नेत्यांनी नाही, नागरिकांनी पुरवली आहे.त्यात भाजप चे उपनेते सुध्दा सामील आहेत.ज्यांना चोरीचा आणि मोदींचा राग येतो.
      राहुल गांधी यांना बोगस मतदार यादी,मत चोरीची फाईल मिळताच त्यांनी कांग्रेस कार्यकर्ते कामाला लावून पडताळणी करून घेतली.भाजप ची दुखती नस पकडली.ज्या मुळें भाजप आणि मोदी निवडून येत होते.ती नस म्हणजे भाजपची ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम ची ब्लड कंडक्टर आहे.मत चोरीचे प्रकरण निवडणूक आयुक्त पुढे मांडले तर ते नाकारू शकले नाही.म्हणून अनेक बहाणा करीत आहेत.आता मुख्य न्यायाधीश समोर मांडली आहे.पुरावा सहित.मोदींची खुर्ची हालू लागली आहे.भाजप मधे चर्चा सुरू झाली आहे.मोदींना काढले तर प्रधानमंत्री कोण?पण मोदी  वेगळेच नियोजन करीत आहेत.मरेपर्यंत मी प्रधानमंत्री कसा राहिन?जसे रशिया चे पुतीन.चीन चे शीन पींग.कोरीयाचे किम जोन.या तीन देशातील हुकुमशाही कशी टिकून आहे?याचा अभ्यास दौरा चालू आहे.
    यातून सुटकेचा एकच मार्ग आहे,राहुल गांधी.ते प्रधानमंत्री बनण्याच्या दिशेने जात आहेत. पप्पू टू पीएम!
लेखन - शिवराम पाटील
संपर्क - *९२७०९६३१२२*
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत